मकरसंक्रांतीच्या दिवशी खा 'हे' पारंपारिक पदार्थ, आरोग्यासाठीही फायदेशीर

देशभरात जानेवारीच्या महिन्यात मकरसंक्रांतीचा सण येतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. वैज्ञानिकदृष्ट्या मकरसंक्रांतीचे महत्त्व आहे. 

| Jan 09, 2024, 18:19 PM IST

Makar Sankranti Superfood: देशभरात जानेवारीच्या महिन्यात मकरसंक्रांतीचा सण येतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. वैज्ञानिकदृष्ट्या मकरसंक्रांतीचे महत्त्व आहे. 

1/7

मकरसंक्रांतीच्या दिवशी खा 'हे' पारंपारिक पदार्थ, आरोग्यासाठीही फायदेशीर

Makar Sankranti 2024 taste these 8 traditional food

भारतात संक्रात सण विविध नावाने साजरा केला जाते. पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते.मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी. हिमाचल प्रदेश व पंजाबमध्ये लोहडी .या नावाने साजरे केले जातात. 

2/7

पारंपारिक पद्धतीचे पदार्थ

Makar Sankranti 2024 taste these 8 traditional food

मकरसंक्रातीच्या व लोहरीच्या दिवशी खास पद्धतीचा आहार घेतला जातो. पारंपारिक पद्धतीचे पदार्थ आहेत. कोणते आहेत हे पदार्थ जाणून घेऊया.

3/7

तिळगुळ

Makar Sankranti 2024 taste these 8 traditional food

तिळगुळाचे लाडू या दिवसांत आवर्जून खाल्ले जातात. तिळ आणि गुळाचा पदार्थ वापरुन केले जातात. 

4/7

शेंगदाण्याचे लाडू

Makar Sankranti 2024 taste these 8 traditional food

लोहरी व मकरसंक्रांतीच्या दिवसात तिळगुळाच्या लाडुप्रमाणेच शेंगदाण्याचे लाडुदेखील खाल्ले जातात. यामुळं शरीरात उष्णता निर्माण होते. 

5/7

रेवडी

Makar Sankranti 2024 taste these 8 traditional food

मकरसंक्रांतीच्या काळात गुळ आणि तिळापासून बनवलेली रेवडी खाल्ली जाते. 

6/7

गुळ

Makar Sankranti 2024 taste these 8 traditional food

या सणाचा मुख्य भाग म्हणजे गुळ हा आहे. त्यामुळं गुळापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात.

7/7

गाजराचा हलवा

Makar Sankranti 2024 taste these 8 traditional food

गाजर, दूध, साखर आणि मेवा टाकून बनवलेला गाजराचा हलवाही या दिवसांत खाल्ला जातो