PHOTO : नणंदेच्या 12 वर्षे लहान Ex बॉयफ्रेंडवर जडला 48 वर्षीय अभिनेत्रीचा जीव; चित्रपटात काम न करताही आहे 100 कोटींची संपत्ती

Entertainment : फिटनेस आयकॉन असण्यासोबतच, बॉलिवूड दिवा अशी या अभिनेत्रीची ओळख आहे. एकाही चित्रपटात काम न करता ती 100 कोटींची मालकीण आहे. 

| Oct 23, 2024, 09:25 AM IST
1/9

आम्ही बोलत आहोत, आज 51 वर्षीय मलायका अरोराबद्दल, तिचा जन्म 23 ऑक्टोबर 1973 मुंबईत झाला. या अभिनेत्रीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिचं आयुष्य इतकं सोपं नव्हतं. तिने तिच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. 

2/9

अभिनेत्रीने घराला हातभार लावण्यासाठी कमी वयात मॉडेलिंगचा प्रवास सुरु केला. व्हिडीओ जॉकी म्हणून तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात, मलायकाने प्रसिद्ध संगीत टीव्ही MTV इंडियासाठी VJ म्हणून काम केलं. 

3/9

अभिनेत्रीने 1998 मध्ये आलेल्या 'दिल से' या चित्रपटातील आयटम डान्स 'छैय्या छैय्या...'ने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली, जी आजही आयकॉनिक मानली जाते.

4/9

मलायका तिचा सलमान खानचा भाऊ अरबाज खानच्या प्रेमात पडली. 5 वर्षे डेट केल्यानतंर त्यांनी 1998 मध्ये लग्न केलं. बॉलिवूडमधील परफेक्ट कपल आणि पॉवर कपल म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. 

5/9

पण नंणदेच्या एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडली आणि नवऱ्यापासून 2016 मध्ये ती दुरावली. एवढंच नाही तर 2017 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मलाइकाला अरबाजकडून 15 कोटींची पोटगी मिळाली होती. अरबाज आणि मलायकाला एक मुलगा अरहान खान नावाचा मुलगा असून त्यांची जबाबदारी दोघांनीही घेतलीय. 

6/9

12 वर्ष लहान अर्जुन कपूर आणि मलायकाच्या नात्याने बॉलिवूडसह चाहत्यांनाही धक्का बसला. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, अर्जुन अनेक वर्ष सलमान खानची बहीण अर्पिता खानला डेट करत होता. 

7/9

अनेक वर्ष एकत्र डेट केल्यानंतर काही महिन्यापूर्वी त्यांच्या मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. पण गेल्या महिन्यात 11 सप्टेंबर 2024 रोजी मलायकाचे वडील अनिल अरोरा यांचं निधन झालं. तेव्हा अर्जुन मलायकासोबत खंबीर पणे उभा असलेला दिसून आला. 

8/9

मलायका अरोरा आता चित्रपटांमध्ये दिसत नाही पण टीव्ही शोमध्ये ती सक्रिय असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोराची एकूण संपत्ती 100 कोटी रुपये आहे. मलायका कोणत्याही चित्रपटातील आयटम साँगसाठी दीड कोटी रुपये घेते. तर टीव्ही शो जज करण्यासाठी ती एका एपिसोडसाठी 6 ते 8 लाख रुपये मानधन घेते. 

9/9

मलायका तिची बहुतेक कमाई योगा स्टुडिओमधून करते. या व्यतिरिक्त, तिला अनेक ब्रँड्सद्वारे समर्थन मिळाले आहे ज्यामुळे गेल्या काही वर्षांत तिची नेट वर्थ लक्षणीय वाढली आहे.