जगप्रसिद्ध हनीमून डेस्टिनेशन असलेलं मालदीव जगाच्या नकाशावरुन गायब होणार? वैज्ञानिक टेन्शनमध्ये

मालदीव हे जगप्रसिद्ध  हनीमून डेस्टिनेशन आहे. अथांग समुद्र किनारा, पांढरी वाळू आणि बरचं काही.. मालदीवचे निसर्गसौंदर्य भुरळ घालणारे आहे. मात्र, हेच मालदीव जगाच्या नकाशावरुन गायब होणार आहे. यामुळे  वैज्ञानिकही टेन्शनमध्ये आले आहेत. 

| Sep 06, 2024, 18:35 PM IST

Maldives : मालदीव हे जगप्रसिद्ध  हनीमून डेस्टिनेशन आहे. अथांग समुद्र किनारा, पांढरी वाळू आणि बरचं काही.. मालदीवचे निसर्गसौंदर्य भुरळ घालणारे आहे. मात्र, हेच मालदीव जगाच्या नकाशावरुन गायब होणार आहे. यामुळे  वैज्ञानिकही टेन्शनमध्ये आले आहेत. 

 

1/7

ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्राचा जलस्तर वाढत आहे. यामुळे सागरी किनाऱ्यांवर असलेल्या प्रदेशांना धोका निर्माण झाला आहे. मालदीव देखील हळू हळू समुद्रात बुडत आहे.   

2/7

मालदीवला समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यासाठी येथील सरकारने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) च्या शास्त्रज्ञांची मदत घेतली आहे. भराव टाकून बेट वाचवण्याचा प्रय्तन केला जात आहे. तसेच अनेक पर्यायी उपया शोधले जात आहेत. 

3/7

2050 पर्यंत मालदीवचा 80 टक्के भाग पाण्यात बुडेल असा दावा संशोधकांनी केला आहे. 

4/7

मालदीवच्या आजूबाजूच्या समुद्राची पातळी दरवर्षी 3 ते 4 मिमीने वाढत आहे. येत्या काही वर्षांत येथील पाण्याची पातळी एक मीटरने वाढू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.  

5/7

समुद्राची पातळी सर्वात कमी असणाऱ्या देशांच्या यादीत मालदिवचा समावेश होतो. अशा परिस्थितीत समुद्राची वाढती पातळी मालदीवसाठी धोक्याची घंटा बनली आहे.   

6/7

मालदीवमधील बहुतेक क्षेत्र फक्त एक मीटर म्हणजे समुद्रसपाटीपासून 3.3 फूट उंचीवर आहेत. 

7/7

पृथ्वीवरील स्वर्ग अशी मालदीवची ओळख आहे. मालदीव देशाला तब्बल 900 किमी लांबीची समुद्र किनारा लाभलेला आहे. मालदीवमध्ये तब्बल 1200 बेट आहेत.