ऑफिसमध्ये महिला कर्मचाऱ्यांना Honey-Sweety बोलणं पडणार महागात

Sep 22, 2021, 15:07 PM IST
1/5

नोकरी जाण्याचा धोका

नोकरी जाण्याचा धोका

ऑफिसमध्ये महिला कर्मचाऱ्यांना हनी, लव, स्वीटी सारख्या विशेषणांनी हाक मारणे धोक्याच ठरू शकतं. या प्रकरणात एका व्यक्तीने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. कोर्टाने देखील कंपनीच्या निर्णयाला सहमती दिली आहे. 

2/5

कोर्टाने देखील फटकारलं

कोर्टाने देखील फटकारलं

कोर्टाने लोकांना वॉर्निंग दिली आहे की, ऑफिसमध्ये महिला कर्मचाऱ्यांना अशा नावांनी बोलवणं हे अपमान करण्यासारखं आहे. कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितले की, महिला कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये "लव' या शब्दात संबोधणं हा त्यांचा अपमान आहे.

3/5

महिलांकरता अपमानास्पद आहेत हे शब्द

महिलांकरता अपमानास्पद आहेत हे शब्द

न्यायाधीशांनी सांगितले की स्वीटी, लव  आणि हनी सारख्या शब्दांनी संबोधणे म्हणजे महिलांचा अपमान आहे. महिला कर्मचाऱ्यांकरता हा शब्द वापरणे म्हणजे त्यांचा अपमान आहे. 

4/5

कर्मचाऱ्यांना दिली हे चेतावणी

कर्मचाऱ्यांना दिली हे चेतावणी

फ्यूनरल होमचे मॅनेजर माइक हार्टले माइकवर आरोप केला होता की, आपल्यासोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना या शब्दांनी बोलावणं म्हणजे त्यांचा अपमान आहे. कामावरून काढल्यानंतर माइकने मेनचेस्टर कोर्टात याचिका दाखल केल्या. तेव्हा त्यांनी माहिती दिली की, ते फक्त महिला कर्मचाऱ्यांनाच नाही तर पुरूष कर्मचाऱ्यांना देखील मेट आणि पाल सारख्या शब्दांनी संबोधत असतं. 

5/5

कोर्ट ने कही ये बात

कोर्ट ने कही ये बात

माइकचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने म्हटले की, महिला आणि पुरुषांसाठी वापरलेल्या शब्दांची तुलना होऊ शकत नाही. एखाद्याला सोबती किंवा पाल म्हणणे हा अपमान नाही. पण स्त्रीला लव, हनी, स्वी आणि बेब्स म्हणणे हा तिचा अपमान आहे. यामुळे, कंपनीचा निर्णय पूर्णपणे योग्य आहे आणि न्यायालय ते मान्य करत आहे.