कंडोमची एक आयडिया अन् रस्त्यावर औषध विकणारे बनले 967030000000 रुपयांचे मालक!

भारतीय उद्योग जगतामध्ये याच कंडोमच्या संकल्पनेनं मेरठमधील भावांच्या जोडीनं कोट्यवधींची संपत्ती उभी केली.   

Sep 05, 2024, 13:48 PM IST

कंडोम... ही एक संकल्पना कधी कोणाला कोट्यधीश करून गेल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? 

1/7

कंडोम बनवणारी कंपनी

mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change

मॅनकाईंड या कंपनीचा अनेकांसमोर असणारा चेहरा म्हणजे कंडोम बनवणारी कंपनी. पण, प्रत्यक्षात मात्र तसं नाहीय. कारण, मॅनकाईंड ही कंपनी फक्त कंडोमचीच निर्मिती आणि विक्री करत नाही, तर ही देशातील चौथ्या क्रमांकाची फार्मा कंपनी आहे. 

2/7

प्रगतीच्या वाटेवर अतिशय वेगानं प्रवास

mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change

तब्बल 96703 कोटी रुपयांची उलाढाल असणारी ही कंपनी गेल्या काही काळापासून रातोरात प्रगतीच्या वाटेवर अतिशय वेगानं प्रवास करताना दिसत आहे. पण, या यशामागे एका संघर्षाची कहाणी आहे हे मात्र विसरून चालणार नाही. 

3/7

मेडिकल रिप्रेजेंटेटिव

mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change

उत्तर प्रदेशातील परिवहन मंडळाच्या बसमध्ये धक्के खात MR म्हणजेच मेडिकल रिप्रेजेंटेटिवनं असं काही पाहिलं की, त्यांच्या कल्पनाशक्तीला कलाटणीच मिळाली आणि मॅनकाईंडचा जन्म झाला. रमेश जुनेजा हे 1974 दरम्यान एमआर म्हणून काम करत आपल्या कंपनीची औषधं विकण्यासाठी अनेक तास दवाखान्यांमध्ये डॉक्टरांच्या प्रतीक्षेत ताटकळत असत. मिळकत जास्त नसल्यामुळं त्यांनी परिवहन मंडळाच्या बसनंच कायम प्रवास केला.   

4/7

औषधं

mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change

एके दिवशी त्यांनी पाहिलं की पैशांअभावी एक व्यक्ती चांदीचे दागिने देऊन औषधं खरेदी करण्याचा प्रयत्न करत होता. तिथंच जुनेजा यांनी आपण सामान्यांना परवडतील अशा दरात औषधं तयार करयची असा निर्धार केला आणि बेस्टोकेम नावाची फार्मा कंपनी सुरू केली.

5/7

Mankind ची सुरुवात

mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change

काही महिन्यांतच त्यांची ही कंपनी बंद पडली. त्यानंतर पुढे त्यांनी राजीव जुनेजा या भावाला सोबत घेत 1995 मध्ये  Mankind ची सुरुवात केली. सुरुवातीला 50 लाखांची रक्कम खर्ची घालत या भावांच्या जोडीनं 25 एमआरच्या सहाय्यानं ही कंपनी सुरू केली, रमेश जुनेजा यांचा अनुभव इथं मोठी मदत करून गेला आणि पहिल्याच वर्षात कंपनीच्या कमाईचा आकडा 4 कोटींवर पोहोचला आणि आजच्या घडीला कंपनीची कमाई 967030000000 रुपयांच्या घरात पोहोचली.  

6/7

व्यवसायाची व्याप्ती

mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change

व्यवसायाची व्याप्ती वाढली. पुढे, औषधनिर्मिती करणाऱ्या या कंपनीनं रणनिती बदलली आणि कॉन्ट्रासेप्टिव प्रोडक्ट (गर्भनिरोधक उत्पादनं) बनवण्याचा निर्णय घेतला. रमेश आणि राजीव जुनेजा यांनी एक कल्पना लढवत कंडोमला बेडरूममधून टीव्ही आणि वर्तमानपत्रांपर्यंत आणलं. 

7/7

उत्पादनांनी धुमाकूळ घातला

mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change

आघाडीच्या टेलिव्हीजन वाहिन्यांपासून महत्त्वाच्या वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानांवरील जाहिरातींपर्यंत त्यांच्या या उत्पादनांनी धुमाकूळ घातला आणि कंपनीला याच निर्णयाचा फायदा झाला. कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये मॅनफोर्सला स्थान मिळालं. इथं मॅनकाईंडच्या मॅनफोर्स कंडोमची विक्री वाढत असतानाच तिथं कंपनीच्या इतर उत्पादनांनाही ग्राहकांकडून चांगली पसंती मिळताना दिसली. प्रेगा न्यूज, अनवाँटेड 72, गॅस ओ फास्ट, अॅक्ने स्टार अशी उत्पादनंही चांगली ग्राहकपसंती मिळवताना दिसतात.