शरीरसंबंध ठेवल्यानंतर तासाभरात पुरुषांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; समोर आली धक्कादायक कारणं

Why Men dies While Having Sex Or After Sexual Act: शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अवघ्या काही वेळात पुरुषांचा मृत्यू होण्याची प्रकरणं सध्या आरोग्य क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकताच यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामध्ये खास करुन पुरुषांबरोबरच असा प्रकार का घडतो? यामागील आरोग्यविषयक कारणं काय आहेत याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. त्यावरच नजर टाकूयात..

| Mar 31, 2024, 12:53 PM IST
1/10

Why Men dies While Having Sex Or After Sexual Act

शारीरिक संबंध ठेवण्याचे मानवी शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात, असं डॉक्टर सांगतात. शारीरिक सुख मिळत असलेल्या जोडप्यांचं मानसिक आरोग्यही ठणठणीत राहतं असं सांगितलं जातं. नियमितपणे शारीरिक संबंध ठेवण्याच्या फायद्यांबद्दल बोलायचं झाल्यास अगदी रक्तदाब नियंत्रणात राहण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत आणि झोपेसंदर्भातील समस्या कमी होण्यापर्यंत अनेक फायद्यांची यादीच वाचता येईल. (प्रातिनिधिक फोटो, एआय इमेज)  

2/10

Why Men dies While Having Sex Or After Sexual Act

शरीर संबंध ठेवताना किंवा हस्तमैथून करताना शरीरामध्ये ऑक्सीनिक संप्रेरकाचं उत्सर्जन होतं. याला लव्ह हार्मोन असंही म्हणतात. दोन व्यक्तींमध्ये विश्वास आणि बॉण्डींग निर्माण करण्यासाठी हे संप्रेरक महत्त्वाची भूमिका बजावतं. मात्र ज्याप्रमाणे शरीरसंबंध ठेवण्याचे जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे हल्ली शरीरिक संबंध ठेवण्याचे काही धोकादायक साईड इफेक्ट्सही आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनामध्ये सेक्स करुन झाल्यानंतर काही वेळातच मरण पावण्याचं प्रमाण वाढल्याचं चित्र दिसत आहे. अर्थात अशाप्रकारे मरण पावणाऱ्यांची संख्या एकूण संख्येच्या तुलनेत फारच कमी असली तरी ती चिंता वाढवणारी आहे. (प्रातिनिधिक फोटो)  

3/10

Why Men dies While Having Sex Or After Sexual Act

सेक्सनंतर एखाद्याचा मृत्यू का होतो यामागे अनेक कारणं असू शकतात. अनेक प्रकरणांमध्ये सेक्सदरम्यान शारीरिक मेहनत अधिक झाल्याने आणि त्यातच सेक्स अधिक काळ करता यावा यासाठी औषधं घेतल्याने मृत्यू होतो. अनेक देशांमध्ये तर नशेच्या आहारी जाऊन सेक्स करणाऱ्यांचं प्रमाण इतकं आहे की लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या औषधांबरोबरच अनेक बेकायदेशीर अंमली पदार्थांचंही सेवन केलं जातं. त्यामुळेच कोकन वगैरे सेवन करुन सेक्स केल्यानंतर काही काळात मृत्यू झाल्याची प्रकरणंही समोर आली आहेत. (प्रातिनिधिक फोटो)  

4/10

Why Men dies While Having Sex Or After Sexual Act

वय अधिक असेल तर सेक्सनंतर हृदयविकाराचा झटका येऊन प्राण जाण्याची शक्यताही असते असं सायन्स अलर्ट डॉट कॉमवरील लेखात म्हटलं आहे. जर्मनीमध्ये मागील 33 वर्षांमध्ये झालेल्या 32 हजार आकस्मिक मृत्यूंच्या शवविच्छेदन अहवालांचा अभ्यास करुन तयार केलेल्या रिपोर्टनुसार, आकस्मिक मृत्यूंपैकी 0.2 टक्के मृत्यू हे शारीरिक संबंधांसंदर्भातील क्रियेनंतर झाले होते. (प्रातिनिधिक फोटो)  

5/10

Why Men dies While Having Sex Or After Sexual Act

सामान्यपणे सेक्स केल्यानंतर अचानक मरण पावणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण हे स्त्रियांपेक्षा अधिक आहे. सेक्सनंतर आकस्मिक मृत्यू झालेल्या पुरुषांचं सरासरी वय 59 वर्ष इतकं आहे. त्याही हृयविकाराचा झटका आल्याने मरण पावणाऱ्या पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. अशाचप्रमाणे सेक्सनंतर येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यासंदर्भात अमेरिका, फ्रान्स आणि दक्षिण कोरियामध्येही अभ्यास करण्यात आला असून तिथेही असेच पुरावे आढळून आले आहेत. (प्रातिनिधिक फोटो)  

6/10

Why Men dies While Having Sex Or After Sexual Act

सेक्सनंतर आकस्मिक मृत्यूचं प्रमाण केवळ मध्यमवयीन पुरुषांमध्येच अधिक आहे असं नाही. लंडनमधील सेंट जॉर्ज युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये याचे पुरावे सापडले आहेत. जेएएमए कार्डिओलॉजी या नियतकालिकामध्ये छापून आलेल्या या अभ्यासामधील संशोधनात, जानेवारी 1994 ते जानेवारी 2020 हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या एकूण 6847 केसेस सेंट जॉर्जमधील कार्डिएल पॅथेलॉजीमध्ये आल्या. (प्रातिनिधिक फोटो)

7/10

Why Men dies While Having Sex Or After Sexual Act

हृयविकाराच्या झटक्याने मरण पावलेल्या या 6847 रुग्णांपैकी 17 जणांचा मृत्यू शरीरसंबंध ठेवल्यानंतर अवघ्या तासाभरात झाल्याचं स्पष्ट झालं. अशाप्रकारे मरण पावलेल्या रुग्णांचं सरासरी वय 38 वर्ष इतकं असल्याचं समोर आलं. यापैकी 35 टक्के मृत रुग्ण या महिला होत्या. हा आकडाही आधीच्या आकडेवारीपेक्षा अधिक आहे. (प्रातिनिधिक फोटो)

8/10

Why Men dies While Having Sex Or After Sexual Act

मात्र मरण पावलेल्या या रुग्णांना आलेला हृदयविकाराचा झटका हा सामान्य झटक्याप्रमाणे नव्हता. यापैकी 53 टक्के रुग्णांच्या हृदयामध्ये रचनात्मकरित्या कोणताही दोष मृत्यूवेळी आढळून आला नाही. या 53 टक्के रुग्णांचा मृत्यू हृदयाची गती अचानक वाढल्याने म्हणजेच सडन अॅरेथमिक डेथ सिंड्रोममुळे (एसएडीएस) झाला. (प्रातिनिधिक फोटो)

9/10

Why Men dies While Having Sex Or After Sexual Act

अॅरोटिक डिसर्शन हे सेक्सनंतर मरण पावलेल्या रुग्णांमधील दुसरे महत्त्वाचे कारण आढळून आले. यामध्ये हृदयाकडून शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमणीचं आवरण फाटतं आणि रक्त या आवरणामधील पोकळीमधून वाहू लागतं. यामुळे धमण्या फुगतात आणि तणा वाढल्याने फुटतात. (प्रातिनिधिक फोटो)

10/10

Why Men dies While Having Sex Or After Sexual Act

मरण पावलेल्या इतर रुग्णांच्या हृदयाच्या रचनेमध्ये दोष निर्माण झाला. यामध्ये काहींच्या हृदयाचे स्नायू कठोर झाल्याने रक्ताभिसरणावर परिणाम झाला होता. याचप्रमाणे चॅनेलोपॅथिसमुळेही काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचं उघड झालं. यामध्ये शरीरामधील आर्यनच्या माध्यमातून सोडियम आणि पोटॅशियमचं स्नायूंमधील संतुलन बिघडते आणि त्याचा हृदयावर परिणाम होतो. सेक्सनंतर लगेच मरण पावलेल्यांपैकी 50 टक्के मृत्यू हे चॅनेलोपॅथिस आणि सडन अॅरेथमिक डेथ सिंड्रोममुळे झाल्याचं या अभ्यासावरुन स्पष्ट झालं आहे. या समस्या असणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असं सांगितलं जातं. (प्रातिनिधिक फोटो)