'माझ्या करिअरसाठी मिताली...', सिद्धार्थ चांदेकरचं पत्नीबद्दलचे 'ते' वक्तव्य चर्चेत

"अपयश येऊ नये यासाठी माझे हात आता थरथरत नाही", असेही सिद्धार्थ चांदेकर म्हणाला

Mar 15, 2024, 22:47 PM IST
1/8

2021 मध्ये बांधली लग्नगाठ

Marathi Actor Siddharth Chandekar talk about Career change after married with mitali mayekar

सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघेही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखले जाते. सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली.  

2/8

लग्नाच्या तीन वर्षांनंतर काय काय बदल झाला?

Marathi Actor Siddharth Chandekar talk about Career change after married with mitali mayekar

सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाला आता तीन वर्षे उलटले आहेत. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान सिद्धार्थने लग्नाच्या तीन वर्षांनंतर काय काय बदल झाला, याबद्दल भाष्य केले. 

3/8

आता जरा शांतता आली असं वाटतंय

Marathi Actor Siddharth Chandekar talk about Career change after married with mitali mayekar

यावेळी तो म्हणाला "माझ्या कपाटाच्या साइजमध्ये खूप बदल घडलेला आहे. तसंच मी आधी सतत काळजी, चिंता करणारा माणूस होतो. पण आता माझं सतत चिंता करण्याचं प्रमाण कमी झालं आहे. माझ्या आयुष्यात आता जरा शांतता आली असं वाटतंय."

4/8

कामाकडे जास्त प्रभावीपणे लक्ष

Marathi Actor Siddharth Chandekar talk about Career change after married with mitali mayekar

"याशिवाय मी माझ्या लग्नानंतर कामाकडे जास्त प्रभावीपणे लक्ष देऊ लागलो, असं मला वाटतं. माझ्या करिअरसाठी मितालीही अत्यंत लकी ठरली", असे सिद्धार्थने म्हटले. 

5/8

मला याची खात्री

Marathi Actor Siddharth Chandekar talk about Career change after married with mitali mayekar

"आता माझ्या करिअरची गाडी धावतेय. कधीतरी तिचा वेग कमी होती, ती थांबेल किंवा बिघडेल. पण माझ्या आयुष्यात या सुंदर बायका आहेत, त्यांच्यामुळे मी पुन्हा एकदा तो वेग घेईन आणि ती गाडी परत जोरदार धावेल, याची मला खात्री आहे."   

6/8

लग्नानंतर मला अपयशी होण्याची भीती नाही

Marathi Actor Siddharth Chandekar talk about Career change after married with mitali mayekar

"मला आता थांबण्याची किंवा बिघडेल याची भीती वाटत नाही. विशेष म्हणजे लग्नानंतर मला अपयशी होण्याची भीतीच वाटतं नाही."   

7/8

मला अपयश आलं तर

Marathi Actor Siddharth Chandekar talk about Career change after married with mitali mayekar

"कधी ना कधीतरी अपयश येणारचं आहे. मात्र अपयश येऊ नये यासाठी माझे हात आताच थरथरत नाही. मला अपयश आलं तर त्यावेळी जे दुःख होईल, त्रास होईल या सगळ्याला मी सामोरा जाऊ शकतो."   

8/8

मी पुन्हा कमबॅक करेन

Marathi Actor Siddharth Chandekar talk about Career change after married with mitali mayekar

"मी पुन्हा कमबॅक करेन. लग्नानंतर ही माझ्यात शक्ती आली आहे,” असं सिद्धार्थ चांदेकरने म्हटले. ‘लोकमत फिल्मी’च्या ‘नो फिल्टर’ या मुलाखतीदरम्यान त्याने याबद्दल वक्तव्य केले.