Opinion Polls: मोदी का परिवार, सीएए, राम मंदिराचा भाजपाला फायदा होणार? सर्व्हे काय सांगतो?
Opinion Polls 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी मीडिया आणि मॅट्रिझनं याच निवडणुकीचा ओपिनियन पोल केलाय. यासाठी देशभरात जनमत सर्व्हे घेण्यात आला. या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या 543 जागांवर एक लाख 13 हजार 843 लोकांची मते घेण्यात आली आहेत. सर्व्हेत लोकांना वेगवेळे प्रश्न विचारण्यात आले. मै हूं मोदी परिवार, नारी शक्ती वंदन कायदा, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा याचा मोदी सरकाला फायदा होणार की राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे काँग्रेस उभारी घेणार? CAA कायद्याचा कोणाला फायदा होणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पाहूयत काय आहे जनमत.