1/5
....अशी झाली इशा- ऋषीच्या प्रेमकहाणीची सुरुवात
मुंबई : 'जय मल्हार' या मालिकेच्या निमित्ताने 'बानू' ही भूमिका साकारत अभिनेत्री इशा केसकर प्रेक्षकांच्या भेटीला आली. पाहता पाहता इशा ही प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. एक अभिनेत्री म्हणून ती नावारुपास आली. पुढे जाऊन तिला 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमध्ये 'शनाया'ची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. इशाने तिच्यावर आलेली ही जबाबदारीही लिलया पेलली. इथे इशाने साकारलेली 'शनाया'सुद्धा प्रसिद्धीझोतात येत नाही, तोच तिच्या खासगी आयुष्याचीही जोरदार चर्चा सुरु झाली. याला निमित्त ठरलं ते म्हणजे इशाचं 'काहे दिया परदेस' मालिकेतील मुख्य अभिनेता ऋषी सक्सेना याच्यासोबतचं तिचं नातं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
2/5
....अशी झाली इशा- ऋषीच्या प्रेमकहाणीची सुरुवात
3/5
....अशी झाली इशा- ऋषीच्या प्रेमकहाणीची सुरुवात
'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर या दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं. पाहताक्षणी तो अतिशय शांत असल्याचं इशाच्या लक्षात आलं. त्याच्या (ऋषीच्या मनात त्यावेळी कोणतीही गोष्ट नव्हती.) अर्थात, तेव्हा त्यांच्यात काही बोलणं झालं नाही. नंतर झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने तयारीच्या वेळी पहिल्यांदाच त्यांच्यात बोलणं झालं. पुढे कॉफीसाठीच्या भेटीगाठी वगैरे सुरु झाल्या. इशानेच ऋषीला कॉफीसाठी विचारलं. या भेटीतच त्याचा निरागसपणा तिचं मन जिंकून गेलं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
4/5
....अशी झाली इशा- ऋषीच्या प्रेमकहाणीची सुरुवात
आपल्या मनातल्या भावना तिने व्यक्त केल्या. पण आपल्यात फारशी ओळख नसल्यामुळे नात्याच्या या नव्या वळणाला ऋषी तयार नव्हता. असं असलं तरीही पुढे वर्षभरासाठी ते एकमेकांचे अतिशय चांगले मित्र राहिले. ज्यानंतरच एके दिवशी ऋषीने इशाला भेटण्यास सांगितलं. यामध्ये त्यांच्या भेटीगाठी सुरुच होत्या. तेव्हाच एक धमाल मैत्रीण म्हणून इशा त्याला अनेकदा कोणी मुलगी आवडली का, असंही विचारत होती. पण, ती असं का विचारते असाच प्रश्न तेव्हा ऋषीने तिला विचारला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
5/5