1/6
Year Ender 2019 : यंदाच्या वर्षी 'या' सेलिब्रिटी जोड्यांनी दिली प्रेमाची जाहीर कबुली
२०१९ हे वर्ष खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात घडामोडींचं वर्ष ठरलं. राजकारण, क्रीडा आणि कला जगतामध्ये यंदाच्या वर्षी अशा काही घटना घडल्या ज्याची चर्चा सबंध वर्षभर पाहायला मिळाली. कलाविश्वात म्हणावं तर, सेलिब्रिटी जोड्यांसाठी हे पर्व खास होतं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या काही सेलिब्रिटी जोड्यांनी यंदाच्याच वर्षी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करत या नात्याचा जाहीरपणे स्वीकार केला. चला तर मग, नजर टाकूया अशाच काही जोड्यांवर.....
2/6
रणबीर कपूर - आलिया भट्ट
Alia Bhatt, Ranbir Kapoor कलाविश्वाची अतिशय प्रतिष्ठित असं कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपूर कुटुंबासाठी २०१९ हे वर्ष अनेक अंशी महत्त्वाचं ठरलं. अभिनेता रणबीर कपूर याने आणि अभिनेत्री आलिया भट्ट हिने त्यांचं नातं अतिशय सुरेखपणे स्वीकारलं. चित्रपटात एकेमकांसोबत काम करणं असो किंवा मग खऱ्या आयुष्यात विविध समारंभांना एकत्र हजेरी लावणं असो, आलिया आणि रणबीर कायमच अनेकांनाच #CoupleGoals देत आले आहेत.
3/6
अर्जुन कपूर- मलायका अरोरा
Arjun Kapoor, Malaika Arora अभिनेता अर्जुन कपूर आणि मॉडेल, अभिनेत्री मलायका अरोरा हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. ज्यानंतर अखेर त्यांनी या नात्याची कबुली दिली. सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर हे नातं अधिकृतपणे सर्वांसमोर आलं. येत्या काही दिवसांमध्ये ही जोडी नात्याला नवं नाव देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
4/6
क्रिती खरबंदा- पुलकीत सम्राट
5/6
फरहान अख्तर- शिबानी दांडेकर
6/6