'मी लग्नात मुद्दाम उपवास करुन...', जुई गडकरीने सांगितला 'तो' किस्सा

 ‘लग्नात जेवायला आवडतं? की जेवण वाढायला आवडेल?’, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सायली फेम अभिनेत्री जुई गडकरीने हटके उत्तर दिले.

Mar 31, 2024, 23:12 PM IST

 ‘लग्नात जेवायला आवडतं? की जेवण वाढायला आवडेल?’, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सायली फेम अभिनेत्री जुई गडकरीने हटके उत्तर दिले.

 

1/8

‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत लग्नसोहळा

Marathi Actress Jui Gadkari loves to eat masala bhat in wedding share story

सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत सार्थक व आनंदी ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.  

2/8

संगीत सोहळ्याचं चित्रीकरण सुरु

Marathi Actress Jui Gadkari loves to eat masala bhat in wedding share story

या विवाहसोहळ्याला ‘स्टार प्रवाह’ परिवारातील इतर मालिकांच्या कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. सध्या मालिकेत संगीत सोहळ्याचं चित्रीकरण सुरु आहे. 

3/8

मुलाखतीत दिले उत्तर

Marathi Actress Jui Gadkari loves to eat masala bhat in wedding share story

यावेळी ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली आणि अर्जुन यांनी हजेरी लावली आहे. यानिमित्ताने सायली व अर्जुन यांनी ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली.

4/8

लग्नात जेवायला आवडतं? की जेवण वाढायला आवडेल?

Marathi Actress Jui Gadkari loves to eat masala bhat in wedding share story

या मुलाखतीत सायली व अर्जुनला ‘लग्नात जेवायला आवडतं? की जेवण वाढायला आवडेल?’, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सायली फेम अभिनेत्री जुई गडकरीने हटके उत्तर दिले. 

5/8

मसालेभात खायला प्रचंड आवडतो

Marathi Actress Jui Gadkari loves to eat masala bhat in wedding share story

'मला जेवायला आवडतं. लग्नात मला मसालेभात खायला प्रचंड आवडतो. जर लग्न पुण्यात पारंपरिक मंगल कार्यात असेल तर तेथील पारंपरिक पदार्थ खायला खूप आवडतात.' असे जुईने म्हटले. 

6/8

पंगतीत बसून जेवायला फार आवडतं

Marathi Actress Jui Gadkari loves to eat masala bhat in wedding share story

'लग्नाचं जेवण जेवायला जायचं असेल तर मी मुद्दाम उपवास वगैरे करुन जाऊ शकते. पिवळी बटाट्याची भाजी, पुरी, जिलेबी, मसालेभात हे पारंपरिक पदार्थ खूप आवडतात. तसे पंगतीत बसून जेवायला फार आवडतं', असे जुई गडकरी म्हणाली.   

7/8

सायली व अर्जुन यांची हटके स्टोरी

Marathi Actress Jui Gadkari loves to eat masala bhat in wedding share story

जुई गडकरी ही सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत झळकत आहे. यात ती सायली हे पात्र साकारताना दिसत आहे. सध्या या मालिकेत सायली व अर्जुन यांच्यातील प्रेम बहरताना पाहायला मिळतं आहे.  

8/8

टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर

Marathi Actress Jui Gadkari loves to eat masala bhat in wedding share story

सायली आणि अर्जुनच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेलाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल स्थानावर आहे.