पूजा सावंतच्या साखरपुड्याचे खास फोटो, मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंतचा साखरपुडा पार पडला. पाहा खास फोटो

Feb 17, 2024, 19:39 PM IST

निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंतचा साखरपुडा पार पडला. पाहा खास फोटो

 

1/7

Marathi Actress Pooja Sawant And Siddhesh Chavan Engagement Photos

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंतचा नुकताच साखरपुडा पार पडला.   

2/7

Marathi Actress Pooja Sawant And Siddhesh Chavan Engagement Photos

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला. त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आता समोर आले आहेत. 

3/7

Marathi Actress Pooja Sawant And Siddhesh Chavan Engagement Photos

यावेळी पूजा सावंतने हिरवी पैठणी साडी, नाकात नथ, भरजरी हार असा पारंपरिक लूक केला होता. तर सिद्धेशने गोल्डन रंगाचा कुर्ता परिधान केला होता. 

4/7

Marathi Actress Pooja Sawant And Siddhesh Chavan Engagement Photos

यात ते दोघेही अतिशय सुंदर दिसत होते. अखेर शुक्रवारी (16 फेब्रुवारी 2024) गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.  

5/7

Marathi Actress Pooja Sawant And Siddhesh Chavan Engagement Photos

पूजा सावंतच्या साखरपुड्याला वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधानने देखील हजेरी लावली होती.

6/7

Marathi Actress Pooja Sawant And Siddhesh Chavan Engagement Photos

पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो.

7/7

Marathi Actress Pooja Sawant And Siddhesh Chavan Engagement Photos

तर पूजा सावंत ही काही दिवसांपूर्वी ‘मुसाफिरा’ चित्रपटात झळकली होती. यामध्ये पुष्कर जोग, दिशा परदेशी, स्मृती सिन्हा, पुष्कराज चिरपुटकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.