प्राजक्ताचे आणखी एक स्वप्न पूर्ण, फोटो शेअर करत म्हणाली 'वाट पाहण्यापेक्षा...'

 सध्या प्राजक्तावर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत. 

Apr 10, 2024, 22:59 PM IST
1/9

प्राजक्ता गायकवाड घराघरात लोकप्रिय

Marathi Actress Prajakta Gaikwad buy new hyundai car share photos and caption on instagram

छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता गायकवाडला ओळखले जाते. आतापर्यंत तिने अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

2/9

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात

Marathi Actress Prajakta Gaikwad buy new hyundai car share photos and caption on instagram

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. 

3/9

चाहत्यांना दिली एक गुडन्यूज

Marathi Actress Prajakta Gaikwad buy new hyundai car share photos and caption on instagram

तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नेहमीच चर्चेत असते. आता प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.  

4/9

पाडव्याच्या मुहुर्तावर अलिशान गाडीची खरेदी

Marathi Actress Prajakta Gaikwad buy new hyundai car share photos and caption on instagram

प्राजक्ता गायकवाडने एक अलिशान गाडी खरेदी केली आहे. तिने सोशल मीडियावर याचे काही फोटो आणि एक व्हिडीओ पोस्ट केला आहेत. 

5/9

नवीन गाडीची पूजा करतानाचा फोटो केला शेअर

Marathi Actress Prajakta Gaikwad buy new hyundai car share photos and caption on instagram

प्राजक्ता गायकवडाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती, तिची आई आणि तिचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. यानंतर प्राजक्ता तिच्या नवीन गाडीची पूजा करताना दिसत आहे.  

6/9

चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Marathi Actress Prajakta Gaikwad buy new hyundai car share photos and caption on instagram

प्राजक्ताने गुढीपाडव्याच्या निमित्ताने पांढऱ्या रंगाची हुंडाई गाडी खरेदी केली आहे. आता सध्या प्राजक्तावर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत.  

7/9

कॅप्शन चर्चेत

Marathi Actress Prajakta Gaikwad buy new hyundai car share photos and caption on instagram

'जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा', असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. 

8/9

'वीर मुरारबाजी' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त

Marathi Actress Prajakta Gaikwad buy new hyundai car share photos and caption on instagram

दरम्यान सध्या प्राजक्ता ही 'वीर मुरारबाजी' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ती या चित्रपटात कोणत्या भूमिकेत झळणार याचा अद्याप खुलासा झालेला नाही. 

9/9

'धर्मवीर संभाजी' या महानाट्यातही अभिनय

Marathi Actress Prajakta Gaikwad buy new hyundai car share photos and caption on instagram

तर दुसरीकडे ती अमोल कोल्हेंसोबत 'धर्मवीर संभाजी' या महानाट्यात अभिनय करत आहे.