सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी! कॅप्शननं वेधलं लक्ष; म्हणाल्या, 'माझ्या भावाला...'

Sushma Andhare Raksha Bandhan Post For Uddhav Thackeray: शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून समोर आलेल्या काही मोजक्या नेतृत्वांपैकी एक म्हणजे सुषमा अंधारे. सुषमा अंधारे यांनी रक्षाबंधनानिमित्त पोस्ट केलेल्या फोटोंबरोबर या फोटोंना दिलेली कॅप्शनही चर्चेचा विषय ठरतेय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

| Aug 19, 2024, 10:03 AM IST
1/8

Sushma Andhare Raksha Bandhan

फोटोंइतकीच चर्चा सुषमा अंधारेंनी दिलेल्या कॅप्शनची... पाहा आपल्या या लाडक्या भावासाठी सुषमा अंधारेंनी नेमकं काय मागितलं आहे.

2/8

Sushma Andhare Raksha Bandhan

उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रॅण्ड नेत्या अशी ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर रक्षाबंधननिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत.  

3/8

Sushma Andhare Raksha Bandhan

या फोटोंमध्ये सुषमा अंधारे यांनी रक्षाबंधननिमित्त उद्धव ठाकरेंना राखी बांधल्याचं पाहायला मिळत आहे.

4/8

Sushma Andhare Raksha Bandhan

उद्धव ठाकरेंना ओवाळतानाचाही एक फोटो सुषमा अंधारेंनी पोस्ट केला आहे.

5/8

Sushma Andhare Raksha Bandhan

एका फोटोमध्ये सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंच्या कपाळावर टीळा लावताना दिसत आहेत.

6/8

Sushma Andhare Raksha Bandhan

रक्षाबंधननिमित्त सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना खास भेटवस्तू दिल्याचंही फोटोंमध्ये दिसत आहे. 

7/8

Sushma Andhare Raksha Bandhan

या फोटोंना सुषमा अंधारेंनी दिलेली कॅप्शन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 'इडा पीडा जाऊ दे... भावाचे राज्य येवू दे.. भावाला माझ्या सौख्य लाभू दे.. त्याचा वंशवेलू गगनाला भिडू दे...' अशी कॅप्शन त्यांनी हे फोटो शेअर करताना दिली आहे. 

8/8

Sushma Andhare Raksha Bandhan

शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर सुषमा अंधारे या त्यांच्या भषणांबरोबर बेधडक भूमिकेमुळे अल्पवावधीत ठाकरे गटातील एक प्रमुख नेत्या झाल्या आहेत.