Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाईचे मराठी उखाणे

आषाढी एकादशीनिमित्त खास मराठमोळे उखाणे. विठ्ठल रखुमाई यांच्यावर आधारित खास उखाणे 

| Jul 13, 2024, 16:18 PM IST

17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी हे हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. या तिथीला “पद्म एकादशी” असेही म्हटले जाते.आषाढी एकादशी वारकऱ्यांसाठी सर्वात मोठा उत्सव असतो. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. या निमित्ताचे औचित्य साधून खास मराठमोळे उखाणे. 

1/10

आषाढी एकादशीला करावी विठ्ठलाची वारी  राव आहेत माझे खूपच भारी 

2/10

उखाणा ऐकायला सर्व करतात खूप घाई  राव माझे विठ्ठल मी त्यांची रखुमाई 

3/10

पंढरपूरमध्ये आहे  रखुमाई आणि विठोबा  रावांचे नाव घेते  कार्यक्रमाला आली शोभा 

4/10

टाळ मृदंग वाजवत  मुखी विठ्ठलाचे नाम  मी रावांची सीता ते माझे राम 

5/10

खोक्यात खोके खोक्यात कपबशी  रावांचं नाव घेते  आज आहे आषाढी एकादशी 

6/10

आषाढी एकादशीला करु  विठ्ठलाची वारी  रावांचं नाव घेते  बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी 

7/10

संत ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी  रावांचं नाव घेते  सर्वजण म्हणा पांडुरंग जय हरी 

8/10

विठ्ठलाला गळा शोभे तुळशी पत्राचा हार  रावांसोबत करेल मी  सुखी संसाराची जबाबदारी पार 

9/10

वारकरी वाजवे मृदुंग आणि टाळ  रावांनी गळ्यात घातली  रुद्राक्षाची माळ 

10/10

चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठल उभा विटेवर  रावांचं नाव कोरले माझ्या हृदयावर