25KM मायलेज देणाऱ्या SUV ने उडवली दाणादाण; खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा; CRETA-PUNCH ला चारली धूळ

ऑगस्टमध्ये विक्री झालेल्या वाहनांचा सेल्स रिपोर्ट समोर आला आहे. गेल्या महिन्यात अनेक कंपन्यांची फारशी विक्री झालेली नाही.  

Shivraj Yadav | Sep 05, 2024, 17:14 PM IST

ऑगस्टमध्ये विक्री झालेल्या वाहनांचा सेल्स रिपोर्ट समोर आला आहे. गेल्या महिन्यात अनेक कंपन्यांची फारशी विक्री झालेली नाही.

 

1/7

ऑगस्टमध्ये विक्री झालेल्या वाहनांचा सेल्स रिपोर्ट समोर आला आहे. गेल्या महिन्यात अनेक कंपन्यांची फारशी विक्री झालेली नाही.  

2/7

यादरम्यान एका एसयुव्हीने हुंडाई क्रेटा आणि टाटा पंचसारख्या गाड्यांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. जाणून घ्या टॉप 5 बेस्ट सेलिंग कार कोणत्या आहेत.   

3/7

Tata Punch - 6 लाख

Tata Punch - 6 लाख

टाटा पंच ऑगस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यात कारच्या 15,643 युनिट्सची विक्री केली आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात विक्री झालेल्या 14,523 युनिट्सच्या तुलनेत ही 8 टक्के जास्त आहे.   

4/7

Maruti Wagon R - 5.54 लाख

Maruti Wagon R - 5.54 लाख

Maruti Wagon R चौथ्या क्रमांकावर आहे. ऑगस्टमध्ये कारच्या 16,450 युनिट्सची विक्री झाली आहे. गतवर्षी झालेल्या 15,578 युनिट्सच्या तुलनेत ही 6 टक्के जास्त आहे.   

5/7

Hyundai Creta - 11 लाख

Hyundai Creta - 11 लाख

Hyundai Creta तिसऱ्या स्थानावर आहे. ऑगस्टमध्ये एकूण 16,762 युनिट्सची विक्री झाली. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात 13,832 युनिट्सची विक्री झाली होती. त्यामुळे यावर्षी विक्रीत 21 टक्के वाढ झाली आहे.   

6/7

Maruti Ertiga - 8.69 लाख

Maruti Ertiga - 8.69 लाख

Maruti Ertiga च्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ऑगस्टमध्ये कारच्या 18,580 युनिट्सची विक्री झाली. गतवर्षी कारच्या 12.315 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच यावर्षी 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.   

7/7

Maruti Brezza - 8.34 लाख

Maruti Brezza - 8.34 लाख

Maruti Brezza ने कमाल केली असून, बेस्ट सेलिंग कार झाली आहे. ऑगस्टमध्ये कारच्या 19,190 युनिट्सची विक्री झाली आहे जी गतवर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या 14,572 युनिट्सच्या तुलनेत 32 टक्के जास्त आहे.