Tata ला Maruti देणार टक्कर; 550 किमी रेंज, फ्युचरिस्टिक लूक; पहिली इलेक्ट्रिक SUV आली समोर

मारुती सुझुकीने जपान मोबिलिटी शोमध्ये आपल्या अपडेटेड इलेक्ट्रिक एसयुव्ही eVX कॉन्सेप्ट कारला सादर केलं आहे. सुझुकीने भारतात यावर्षी झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये सर्वात प्रथम ही कार सादर केली होती.   

Oct 27, 2023, 16:27 PM IST

मारुती सुझुकीने जपान मोबिलिटी शोमध्ये आपल्या अपडेटेड इलेक्ट्रिक एसयुव्ही eVX कॉन्सेप्ट कारला सादर केलं आहे. सुझुकीने भारतात यावर्षी झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये सर्वात प्रथम ही कार सादर केली होती. 

1/13

मारुती सुझुकीने जपान मोबिलिटी शोमध्ये आपल्या अपडेटेड इलेक्ट्रिक एसयुव्ही eVX कॉन्सेप्ट कारला सादर केलं आहे. सुझुकीने भारतात यावर्षी झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये सर्वात प्रथम ही कार सादर केली होती.   

2/13

जपानमध्ये सादर करण्यात आलेली ही एसयुव्ही मागील मॉडेलच्या तुलनेत अधिक अपडेटेड दिसत आहे. यामध्ये कंपनीने काही बदल केले आहेत. या एसयुव्हीचा इंटिरिअरही पहिल्यांदाच समोर आलं आहे.   

3/13

या कारची लांबी 4300 मिमी, रुंदी 1800 मिमी आणि उंची 1600 मिमी आहे. यामध्ये 245/45 R20 आकाराच टायर देण्यात आला आहे.   

4/13

कॉन्सेप्ट मॉडेलला कंपनीने पूर्णपणे फ्युचरिस्टिक लूक दिला आहे. या कारला सुझुकी मोटार कॉर्पोरेशनतर्फे डिझाइन आणि डेव्हलप करण्यात आलं आहे.   

5/13

कंपनीने याला सिग्नेचर एसयुव्ही डिझाइन दिलं आहे. कारचा ग्राउंड क्लिअरन्सही जास्त ठेवण्यात आला आहे.   

6/13

यामध्ये मोठे हेडलाइट्स असून, ग्रिलवर LED चे टाइम रनिंग लाइट्स, मस्क्युलर बंपर, क्लैडिंग आणि स्किड प्लेट्स पाहण्यास मिळतात.   

7/13

Maruti eVX मधील इंटिरिअर एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटाप्रमाणे फ्युचरिस्टिक फ्लोटिंग डॅशबोर्डने सजवलं आहे.   

8/13

केबिनमध्ये स्क्वेअर शेप टू-स्पोक स्टिअरिंग व्हील देण्यात आलं आहे. रेडी व्हर्जनमध्ये हे दिलं जाण्याची शक्यता तशी कमीच आहे.   

9/13

कारमधील सीटही अनोख्या पद्धतीने डिझाइन करण्यात आल्या आहेत.   

10/13

ही इलेक्ट्रिक एसयुव्ही भारतीय बाजारपेठेत दाखल होईल तेव्हा दोन वेगळ्या बॅटरी पॅक व्हेरियंटमध्ये येण्याची शक्यता आहे.   

11/13

मोठ्या व्हेरियंटमध्ये 60kWh क्षमतेची बॅटरी देण्याची क्षमता आहे. ही बॅटरी 550 किमी रेंज देईल.   

12/13

तर लोअर व्हर्जनमध्ये 48 kWh ची बॅटरी मिळू शकते, जी 400 किमीची रेंज देईल.   

13/13

मारुती सुझुकीची ही पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे. भारतीय बाजारपेठेत ही कार Tata Nexon EV ला स्पर्धा देणार आहे. 2025 पर्यंत ही कार लाँच होण्याची शक्यता आहे.