श्रीदेवीसारखा नाही झाला फ्रेंड्स अभिनेत्याचा मृत्यू; काय आहे Narcotic Bowel Syndrome?

Matthew Perry Death Real Reason : फ्रेंड्स या लोकप्रिय सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा मॅथ्यू पेरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं सत्य जगासमोर आलं आहे. बाथटबमध्ये पडून नाही तर या आजाराने घेतला अभिनेत्याचा जीव. 

| Oct 31, 2023, 13:37 PM IST

मॅथ्यू पेरी म्हणजे फ्रेंड्स या मालिकेतील चँडलर बिंग (Chandler Bing) या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचं मन जिंकल होतं. या अभिनेत्याचा रविवारी 29 ऑक्टोबर रोजी बाथटबमध्ये मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली. बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी हिचा मृतदेह देखील अशाच स्थितीमध्ये सापडला होता. मॅथ्यू यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 54व्या वर्षी बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला. पण फार कमी लोकांना माहित आहे की, मॅथ्यूने काही वर्षांपूर्वीच मृत्यूशी झुंजत होता. 

(फोटो सौजन्य - Matthew Perry Instagram / iStock)

1/7

घरी सापडल्या 'या' गोष्टी

Matthew Perry death Real Reason what is Narcotic Bowel Syndrome

एका वृत्तसंस्थेनुसार, अधिकाऱ्यांनी मॅथ्यू पेरीच्या घरात डिप्रेशन, तणाव आणि एक सीओपीडीची औषधे सापडली आहेत. COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज आणि हे औषध क्रॉनिक ब्रॉन्कायटिसने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी वापरले जाते. हे औषध सापडल्यामुळं मॅथ्यू पेरी यांच्या धुम्रपानाच्या सवयीकडे इशारा करते. रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, मॅथ्यू खरंच या औषधांचे सेवन करत होते का हे तपासले जाईल.   

2/7

या जीवघेण्या आजाराची लागण

Matthew Perry death Real Reason what is Narcotic Bowel Syndrome

"फ्रेंड्स, लव्हर्स अँड द बिग टेरिबल थिंग" या सिरीजच्या पेरीने सांगितले होते की,  गॅस्ट्रोइंटेस्टाइनल छिद्र होते आणि ड्रग्सच्या गैरवापरामुळे कोलन फुटल्यानंतर त्याने जगण्यासाठी खूप दिवस संघर्ष केला. धक्कादायक म्हणजे तो दोन आठवडे कोमात होता, पाच महिने हॉस्पिटलमध्ये घालवले आणि नऊ महिने त्याला कोलोस्टोमी बॅग वापरावी लागली. आपल्यापैकी बहुतेकांना कदाचित माहित नसेल की त्याची जीवघेणी स्थिती नार्कोटिक बॉवेल सिंड्रोम (NBS) नावाच्या आजारामुळे झाली. याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. 

3/7

Narcotic Bowel Syndrome चे मुख्य कारण काय?

Matthew Perry death Real Reason what is Narcotic Bowel Syndrome

यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये नमूद केल्याप्रमाणे, नार्कोटिक आतड्यांचा सिंड्रोम (Narcotic Bowel Syndrome) हा आजार बरेच दिवस ओपिओइड (Opioid) वापरल्याचा हिडन परिणाम आहे. त्यांच्या अतिवापरामुळे एनबीएससह अनेक प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. NBS मुळे वारंवार पोट दुखणे हे लक्षण दिसू शकते.   ओपिओइड्सच्या जास्त डोस किंवा दीर्घकाळापर्यंत वापर केल्याने ही वेदना अधिक तीव्र होऊ शकते.   

4/7

जीवघेण्या आजाराची लक्षणे

Matthew Perry death Real Reason what is Narcotic Bowel Syndrome

NBS ओळखणे अवघड असते. वेगवेगळ्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकारांसह ही लक्षणे सामायिक करते. NBS चे वैशिष्ट्य म्हणजे ओटीपोटात दुखणे जे ओपिओइडच्या वापराने बिघडते. मळमळ, उलट्या, ओटीपोटात पेटके, सूज येणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या लक्षणांसह असू शकते. 

5/7

कसे ओळखाल?

Matthew Perry death Real Reason what is Narcotic Bowel Syndrome

NBS चे निदान करणे आव्हानात्मक असू शकते, कारण त्याची माहिती कुठे स्पष्ट केलेली नाही. रुग्णाचे दररोजचे रुटीन, रुग्णाचा वैद्यकीय इतिहास आणि दीर्घकालीन ओपिओइड वापर आणि ओटीपोटात दुखणे यांच्यातील संबंध यावर अवलंबून असते. जास्त ओपिओइड डोस असूनही प्रगतीशील वेदना, ओटीपोटात जळजळ होणे आणि ओपिओइड वापर सुरू झाल्यानंतर विशिष्ट कालावधीत वेदना होणे.

6/7

यावर उपाय काय?

Matthew Perry death Real Reason what is Narcotic Bowel Syndrome

NBS व्यवस्थापित करण्याचा प्राथमिक उपचार म्हणजे ओपिओइडचा वापर कमी करणे किंवा बंद करणे. रुग्णांना विथड्रॅप्रेसन्ट्स, क्लोनिडाइन आणि बेंझोडायझेपाइन्सद्वारे देखील मदत मिळू शकते. शिवाय, NBS असलेल्या बर्‍याच व्यक्तींना बद्धकोष्ठता व्यवस्थापित करण्यासाठी रेचक आणि परिधीय ओपिओइड विरोधी औषधांची आवश्यकता असू शकते. तसेच सायकोलॉजिकल थेरपी देखील मदत करते. 

7/7

प्रतिबंधात्मक उपाय

Matthew Perry death Real Reason what is Narcotic Bowel Syndrome

NBS प्रतिबंधित करण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार ओपिओइड वापर समाविष्ट आहे. हेल्थकेअरने दिलेल्या माहितीनुसार, NBS च्या संभाव्यतेची जाणीव असणे आणि विश्वास आणि सहानुभूती यावर आधारित मजबूत रुग्ण-डॉक्टर संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे रुग्णांना त्यांच्या वेदना व्यवस्थापित करण्यासाठी ओपिओइडचा वाढता वापर टाळण्यास मदत करू शकते. बद्धकोष्ठता हा ओपिओइड्सचा एक सामान्य दुष्परिणाम आहे. जीवनशैलीतील बदल, जसे की हायड्रेटेड राहणे, व्यायाम करणे आणि आहारात फायबर समाविष्ट करणे, देखील बद्धकोष्ठता बरे करण्यास करण्यात मदत करू शकतात.