बेली फॅट कमी करण्यासाठी जेवणाची वेळ महत्त्वाची; पाहा कोणत्या वेळी जेवणं योग्य?

बेली फॅट ही आजकाल एक मोठी समस्या बनली आहे. 2023 च्या लॅन्सेट अभ्यासानुसार, भारतातील 23 टक्के महिला आणि 22.1 टक्के पुरुषांचे वजन जास्त आहे. तर 40 टक्के महिला आणि 12 टक्के पुरुषांच्या पोटावर चरबी असते.

| Apr 10, 2024, 08:00 AM IST
1/7

लोक पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतात. मात्र प्रत्येकवेळी त्याचा फायदा होतो असं नाही. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुमच्या खाण्याच्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. 

2/7

बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही तुमचा नाश्ता आणि जेवणाची वेळ पाळली पाहिजे. 

3/7

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'सकाळी 6 वाजता उठणं आणि रात्री 10 वाजता झोपणे हे मानवी शरीराचे नैसर्गिक क्लॉक आहे. यामध्ये ब्रेकफास्ट आणि रात्रीच्या जेवणाची ठराविक वेळ पोटाची चरबी जाळण्यास मदत करू शकते.

4/7

मेटाबॉलिज्मला वेग देण्यासाठी जर कोणी सकाळी 6-7 वाजता उठलं तर त्याने उठल्यानंतर 1 तासाच्या आत निरोगी नाश्ता केला पाहिजे.

5/7

याशिवाय रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी, म्हणजे संध्याकाळी 7 च्या सुमारास जेवलं पाहिजे. यामुळे, झोपेच्या दरम्यान पचनासाठी भरपूर वेळ असतो जेव्हा तुमची चयापचय मंद होते.

6/7

मेटाबॉलिज्म अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करते. जलद चयापचय असलेले लोक विश्रांती घेत असतानाही अधिक कॅलरी बर्न करतात. 

7/7

एका संशोधनात असं आढळून आलेलं की, शरीरात सर्वात कमी कॅलरी रात्री आणि सर्वाधिक कॅलरीज दुपारी आणि संध्याकाळी बर्न होतात. त्यामुळे रात्री उशिरा जेवण टाळावं