WhatsApp च्या नव्या फिचर्सविषयी तुम्हाला 'या' गोष्टी ठाऊक आहेत?

Dec 02, 2018, 12:05 PM IST
1/6

WhatsApp च्या नव्या फिचर्सविषयी तुम्हाला 'या' गोष्टी ठाऊक आहेत?

WhatsApp या सर्वाधिक वापरात असणाऱ्या मेसेजिंग अॅपविषयीचं प्रत्येक वृत्त हे अनेकांसाठीच फार महत्त्वाचं असतं. युजर्सच्या सर्वाधिक वापरात असणारं हे अॅप पाहता त्यामध्ये काळानुरुप आणि तंत्रज्ञानानुरुप काही महत्त्वाचे बदल करण्याचं कामही सुरुच असतं. यातच आता हे अॅप काही नव्या फिसर्चना तुमच्यापर्यंत आणण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे. WaBetaInfoकडून याविषयीची माहिती देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया या नव्या फिचर्सवर कारण, हेच फिचर्स सर्वाधिक वापरात असणाऱ्या या अॅपला आणखी महत्त्व देऊन जाणार आहेत.  

2/6

WhatsApp च्या नव्या फिचर्सविषयी तुम्हाला 'या' गोष्टी ठाऊक आहेत?

मल्टी शेअर फिचर- हे फिचर लाईव्ह झाल्यानंतर कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याचा प्रीव्ह्यू तुम्ही पाहू शकणार आहात. ज्यामुळे एखादा मेसेज पाठवायचा आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता. मुख्य म्हणजे एकाहून अधिक युजर्सना मेसेज पाठवण्यापूर्वीही तुम्हाला त्याचा प्रीव्ह्यू पाहणं शक्य होणार आहे. 

3/6

WhatsApp च्या नव्या फिचर्सविषयी तुम्हाला 'या' गोष्टी ठाऊक आहेत?

कन्सेक्युटिव वॉइस मॅसेज प्लेबॅक- एकामागोमाग एक पाठवण्यात आलेले व्हॉईस मेसेज या माध्यमातून आपोआप प्ले होत राहणार आहेत. पण, त्याकरता पहिला मेसेज हा युजरने स्वत: प्ले करणं अपेक्षित आहे. 

4/6

WhatsApp च्या नव्या फिचर्सविषयी तुम्हाला 'या' गोष्टी ठाऊक आहेत?

ग्रुप कॉल शॉर्टकट- या फिचरच्या मदतीने तुम्ही अगदी सहज पद्धतीने ग्रुप कॉल करु शकता. त्यासोबतच ग्रुपमधील तीन सदस्यांना एकाच वेळीही तुम्ही कॉल करु शकता. 

5/6

WhatsApp च्या नव्या फिचर्सविषयी तुम्हाला 'या' गोष्टी ठाऊक आहेत?

नाईट थीम/ डार्क मोड- ट्विटरवर फार आधीच आलेलं हे बहुप्रतिक्षित फिचर आता व्हॉट्सअॅप  वापरणाऱ्यांनाही उपलब्ध होणार आहे. 

6/6

WhatsApp च्या नव्या फिचर्सविषयी तुम्हाला 'या' गोष्टी ठाऊक आहेत?

स्टिकर सर्च- काही दिवसांपूर्वीच या अॅपवर स्टिकर्स वापरण्याची सुरुवात झाली. स्टिकर्सची लोकप्रियता आणि त्यांचा वाढता वापर पाहता आता यामध्ये स्टिकर्स सर्च करणाऱ्या नव्या फिचरचीही भर पडणार आहे.