Butt Lift Surgery नंतर लोकप्रिय मॉडेल Joselyn Canoचा मृत्यू

Mexican Kim Kardashian म्हणून ओळखली जायची मॉडेल

| Dec 22, 2020, 14:23 PM IST

मुंबई : सुंदर आणि वेगळं दिसण्याच्या नादात अनेकदा लोकं आपला जीव गमावतात. असाच एक प्रकार मैस्किकोमधून समोर आला आहे. अमेरिकन मॉडेल आणि स्विमवियर डिझाइनर जोसलिन कैनो (Joselyn Cano)चा बट-लिफ्ट सर्जरीमध्ये मृत्यू झाला आहे. कैनो मॉडेलिंगच्या जगतातील एक लोकप्रिय नाव आहे. ३० वर्षांच्या कैनोला मैक्सिकन किम कार्दशियन (Mexican Kim Kardashian) च्या नावाने ओळखले जात असे. 

1/5

मैत्रिण आणि मॉ़डेल लीरा मर्सरने केलं ट्विट

मैत्रिण आणि मॉ़डेल लीरा मर्सरने केलं ट्विट

  न्यूयॉर्क पोस्टनुसार, जोसलिन कैनो (Joselyn Cano) च्या मृत्यूची माहिती तिची मैत्रिण आणि मॉडेल लीरा मर्सरने १६ डिसेंबरला ट्विटरवर दिली.  'बट-लिफ्ट सर्जरी' (Butt lift surgery) नंतर कोलंबियामध्ये जोसलिन कैनोचा मृत्यू झाला. 

2/5

कुटूंबाने दिली नाही अधिकृत माहिती

कुटूंबाने दिली नाही अधिकृत माहिती

मात्र, अद्याप जोसलिनच्या कुटुंबियांनी ब्रांड रिप्रेझेंटेटिद्वारे मॉ़डेलच्या मृत्यूची अधिकारिक दृष्ट्या माहिती दिलेली नाही. ब्राझिलियन बट लिफ्ट सर्जरी (Brazilian butt lift surgery) म्हणजे बीबीएल करण्यासाठी याच महिन्याच्या सुरूवातीला ती गेली होती.  

3/5

'मैस्किकन किम कार्दशियन' नावाने लोकप्रिय

आपल्या बोल्ड अदांमुळे कैनो कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. कैनोची लोकप्रियता सर्वाधिक आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या पण जास्त आहे. तिच्या इंस्टाग्रामवर जवळपास १२.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी जोसलिनने आपल्या लोकप्रियतेतून साऱ्यांनाच मागे टाकलं आहे.  

4/5

हॉट फोटोजमुळे चर्चेत

हॉट फोटोजमुळे चर्चेत

जोसलिन कैनोच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक हॉट फोटो आहेत. एका-एका फोटोवर लाखो लाइक्स आणि कमेंट आहेत. जोसलिन हॉट फोटोमुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. 

5/5

या अगोदरही केली होती सर्जरी

या अगोदरही केली होती सर्जरी

जोसलीने मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरूवात वयाच्या १७ व्या वर्षी केली होती. २० वर्षांची होईपर्यंत ती अतिशय लोकप्रिय झाली. सुंदर दिसण्याच्या नादात तिने या अगोदरही सर्जरी केली होती. या अगोदरही तिने बट-लिफ्ट सर्जरी केली होती. तेव्हा देखील तिला या सर्जरीचा धोका निर्माण झाला आहे.