Axolotl पृथ्वीवरचा अमर सजीव; हृदय आणि मेंदूसह शरीराचे तुटलेले सर्व अवयव नव्याने येतात

मानवाचे अवयव तुटल्यास किंवा निष्क्रिय झाल्यास त्या अवयवांचे डॉक्टरांच्या मदतीने कृत्रीमरीत्या प्रत्यारोपण केले जाते. मात्र, हा मासा कोणत्याही शस्त्रक्रियाशिवाय स्वत:च शरीराचे तुटलेले अवयवय पुन्हा तयार करतो.   

Aug 01, 2023, 22:47 PM IST

Mexican Salamander Axolotl : पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक सजीवाचा अंत होतो. पृथ्वीवरील एकाही सजीवाला अमरत्व मिळालेले नाही. मात्र, या पृथ्वीतलावर एक असा सजीव आहे ज्याला अमरत्व प्राप्त झाले नसले तरी त्याच्या विशिष्ट शरीररचनेमुळे हृदय आणि मेंदूसह शरीराचे तुटलेले सर्व अवयव नव्याने येतात.  हा जीव म्हणजे समुद्रातील एक दुर्मिळ प्रजातीचा मासा आहे. Axolotl असे या माशाचे नाव आहे. 

 

1/5

मेक्सिकोच्या सरोवरामध्ये   Mexican Salamander Axolotl हा दुर्मिळ मासा आढळला आहे. 

2/5

Axolotl या मासा पाण्यासह जमीनीवर देखील राहू शकतो. प्रदूषण आणि त्यांच्यावर होणारे इतर जीवांचे आक्रमण यामुळे हा मासा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

3/5

Axolotl या माशा मेंदू विकसित होण्यासाठी 12 आठवडे लागतात. तो दर आठवड्याला हळूहळू मेंदूचा विकास करतो.

4/5

पाठीचा कणा,   हृदय आणि मेंदूसह शरीराचे तुटलेले सर्व अवयव हा मासा तयार करतो.

5/5

 संशोधकांनी Axolotl या माशाच्या शरीरातील बदलांचे बारकाईने निरीक्षण केले. या निरिक्षणादरम्यान  Axolotl  स्वत:चे अवयव स्वत: विकसीत करत असल्याचे समोर आले.