मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवारचा रोमँटिक अंदाज, पाहा फोटो

इन्टाग्रामवर मिलिंद सोमणनं रोमँटिक फोटो शेअर करत शांतता कुठे मिळते हे सांगितलं आहे.

Feb 28, 2021, 16:35 PM IST
1/7

मिलिंद सोमण कधी हटके तर कधी वादग्रस्त केलेल्या फोटोशूटमुळे कायम चर्चेत असतो. यावेळी मात्र मिलिंद-अकिंताच्या रोमँटिक फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

2/7

2018 रोजी मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार विवाह बंधनात अडकले. त्या दोघांच्या प्रेमाला 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता दोघांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.  

3/7

मिलिंदने आपल्या इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मिलिंद अंकिताच्या कुशीत शांत झोपल्याचं दिसत आहे. जगभरात 7 वर्ष एकमेकांसोबत प्रवास केल्यावर अनेक देशांमध्ये प्रवास करून, डोंगर-दऱ्यांमध्ये भटकून, समुद्र तळात शोधून झाल्यानंतर जिथे मला खूप शांत वाटतं अशी जागा इथे आहे कुशीत. जिथे शांतता आणि झोप दोन्ही मिळते. 

4/7

7 वर्षे उलटून गेली एक क्षण वाटतं की हे क्षण कायम आमच्यासोबत असायला हवेत. माझं प्रेम माझ्या जवळ आहे असं म्हणत मिलिंदचे अंकितानं आभार मानले आहेत. 

5/7

अंकिता कोनवार मिलिंदपेक्षा 26 वर्षांनी लहान आहे. एका मुलाखतीमध्ये मिलिंदला याबद्दल विचारलं असता वयाचं मला वाटते वय माणसाला काय करायचे आहे. सेक्स प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचा नाही. हे नातं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आणि जवळचं आहे. 

6/7

 सेक्सबद्दल नसते, ते फक्त नात्याबद्दल असते. हे समाधानकारक आहे. मला असे वाटत नाही की लैंगिक संबंध प्रेमापेक्षा अधिक महत्वाचे आहेत, हे असे संबंध आहे जे महत्वाचे आहे. निकटता महत्वाची आहे. भावना आणि भावनांची उर्जा महत्त्वपूर्ण आहे. जर आपणास असे संबंध नसेल तर आपण ते घेऊ शकता. मला असे वाटते की जेव्हा लोक त्यांच्या आयुष्यात त्यांचे समर्थन करण्यासाठी भावनिक आधार घेत नाहीत तेव्हा ते चुकीच्या मार्गावर जातात.

7/7

जेव्हा लोक त्यांच्या आयुष्यात भावनिक आधार घेत नाहीत किंवा त्यांना मिळत नाही तेव्हा ते जास्त चुकीच्या मार्गावर जातात असं मिलिंद सोमण यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. त्यांनी पोस्ट केलेल्या या रोमँटिक फोटोची सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा होत आहे.