गर्लफ्रेंडच्या मृतदेहाचे 1 हजार तुकडे, मिक्सरमध्ये बारीक केले, कुकरमध्ये शिजवले आणि... मीरा रोड मध्ये नेमकं काय घडलं?

मीरारोडमध्ये लिव्हईनमध्ये महिलेची निर्घृण हत्या झाली आहे. विकृत आरोपी मनोज सहानीला अटक. मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना द्यायचा.

Jun 08, 2023, 21:24 PM IST

Mira Road Murder Case : मीरारोडमध्ये दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. लिव्ह इनमध्ये राहणा-या महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून विल्हेवाट लावली. मीरारोड भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाश दिप बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. जाणून घ्या मीरा रोड हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम.

1/7

मात्र या हत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. 

2/7

च हत्येसाठी वापरण्यात आलेलं सर्व साहित्य जप्त केले. 

3/7

पोलिसांनी आरोपी सहानीला अटक केली आहे. 

4/7

दोन ते तीन दिवसांपूर्वीच मनोजने सरस्वती वैद्यची निर्घृण हत्या करून तिचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले आणि कुत्र्यांना खायला दिले. तर, काही तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून विल्हेवाट लावली.

5/7

मागच्या तीन वर्षांपासून 56 वर्षीय मनोज साने आणि 32 वर्षांची मयत सरस्वती वैद्य हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

6/7

मीरारोड भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाश दिप बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. 

7/7

मीरारोडमध्ये दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली. लिव्ह इनमध्ये राहणा-या महिलेची तिच्या प्रियकरानं निर्घृण हत्या करत तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून विल्हेवाट लावली.