'वॉर्नरची लायकी नसताना त्याला का हिरो करताय? त्याचा सन्मान म्हणजे ऑस्ट्रेलियाचा अपमान'; माजी सहकारी संतापला

Mitchell Johnson On David Warner: ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर त्याची शेवटची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलिया पाकिस्तानविरुद्ध होणारी कसोटी मालिका लवकरच सुरु होतं आहे. वॉर्नरला ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात संधी देण्यात आल्यानंतर त्याचा माजी सहकारी मिचेल जॉनसनने कठोर शब्दांमध्ये वॉर्नरवर टीका केली आहे. तो नेमकं काय म्हणालाय पाहूयात...

| Dec 04, 2023, 09:24 AM IST
1/11

Mitchell Johnson On David Warner

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसनने ज्येष्ठ फलंदाज डेव्हिड वॉर्नरवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. डेव्हिड वॉर्नरला एखाद्या हिरोप्रमाणे त्याच्या कारकिर्दीमधून निरोप का दिला जात आहे? असा सवाल जॉनसनने उपस्थित केला आहे.

2/11

Mitchell Johnson On David Warner

2018 मधील बॉल टॅम्परिंग प्रकरणामध्ये त्याचं नाव आलेलं होतं, असं असतानाही त्याला हिरो का मानलं जात आहे? असा थेट सवाल वॉर्नरच्या माजी सहकाऱ्याने विचारला आहे. वॉर्नरला ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात संधी देण्यात आल्यानंतर मिचेल जॉनसनने हा सवाल उपस्थित केला आहे. 

3/11

Mitchell Johnson On David Warner

मागील काही काळापासून कसोटी क्रिकेटमधील वॉर्नरची कामगिरी पाहता त्याला त्याच्या निवृत्तीच्या तारखेची घोषणा करण्याचा हक्क कसा काय देण्यात आला? असा सवालही मिलेच जॉनसनने विचारला आहे.

4/11

Mitchell Johnson On David Warner

सॅण्डपेपर स्कॅण्डलमध्ये वॉर्नरचा सहभाग होता हे आपण विसरता कामा नये. याच कारणामुळे त्याला एखाद्या हिरोप्रमाणे का निरोप दिला जातोय हे न समजण्यासारखं आहे, असंही मिचेल जॉनसनने म्हटलं आहे. 

5/11

Mitchell Johnson On David Warner

"पाच वर्ष उलटून गेल्यानंतरही डेव्हिड वॉर्नरने बॉल टॅम्परिंग प्रकरणात आपला सहभाग होता ते मान्य केलं नाही. ज्या पद्धतीने त्याला आता निरोप देण्याची तयारी सुरु आहे ती पाहता आणि त्याचं द्वेषपूर्ण वागणं पाहता हा सारा थाट म्हणजे आपल्या देशाचा अपमान आहे," असं जॉनसनने 'द वेस्ट ऑस्ट्रेलियन'मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.

6/11

Mitchell Johnson On David Warner

"डेव्हिड वॉर्नरला निरोप देण्यासाठीची मालिका सुरु होत असतानाच हे सारं का केलं जात आहे मला कोणी सांगू शकेल का? कसोटीमध्ये सातत्याने अपयशी ठरत असलेल्या सलामीवीराला त्याच्या निवृत्तीची तारीख झाहीर करण्याचा हक्क कोणी दिला?" असा प्रश्न मिचेल जॉनसनने विचारला आहे.

7/11

Mitchell Johnson On David Warner

"ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासामधील सर्वात मोठ्या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या या खेळाडूला एखाद्या हिरोसारखा निरोप का दिला जात आहे?" अशा शब्दांमध्ये मिचेल जॉनसनने आपला संताप व्यक्त केला आहे.

8/11

Mitchell Johnson On David Warner

मिचेल जॉनसनने डेव्हिड वॉर्नर कधीच ऑस्ट्रेलियन कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होण्याच्या लायकीचा नव्हता असंही म्हटलं आहे. मागील 3 वर्षांमध्ये वॉर्नरला काहीही विशेष करता आला नाही, असं मिचेल जॉनसन म्हटलं आहे. 

9/11

Mitchell Johnson On David Warner

"वॉर्नर हा ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार शोभत नाही. तो त्याच्या करिअरचा शेवटही आयुष्यभर नेतृत्व करता येणार नाही अशी बंदी असलेल्या काळातच करतोय. त्याचा एकंदरित रेकॉर्ड बरा आहे. काहीजण त्याला सर्वाकालीन उत्तम सलामीवीर म्हणतात. मात्र मागील 3 वर्षात त्याने कसोटीमध्ये सर्वसाधारण कामगिरी केली आहे. त्याची सरासरी तळाच्या फलंदाजासारखी आहे," असं मिचेल जॉनसन म्हणाला आहे.

10/11

Mitchell Johnson On David Warner

"दक्षिण आफ्रिकेमध्ये बॉल टॅम्परिंगच्या माध्यमातून जो अपमान झाला तो न विसरता येणाऱ्यासारखा आहे. सॅण्डपेपरगेटमध्ये वॉर्नर एकटा नव्हता. मात्र तो त्यावेळी संघातील वरिष्ठ खेळाडू होता आणि त्यावेळी त्याला त्याच्या या वरिष्ठपणाचा वापर करायला आवडायचं. त्याच्या या पाकिस्तानविरुद्धच्या निरोपाच्या कसोटीची घोषणा वर्षभरापूर्वीकरण्यात आली. तो खेळापेक्षा आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपेक्षा मोठा आहे का?" असा प्रश्न मिचेल जॉनसन विचारला आहे.

11/11

Mitchell Johnson On David Warner

"एमसीजेमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावलं. मात्र इतक्या वर्षात त्याने याच काय त्या धावा केल्यात. अॅशेज सिरीजमध्ये तो एकदाच 50 धावांपर्यंत पोहोचला. ते ही 17 डावांमध्ये," असंही मिचेल जॉनसन लेखात म्हटलं आहे.