पावसात फोन भिजला किंवा पाण्यात पडला तर?, 'हे' काम करा आधी

How to keep smartphone safe during rain : आजकाल जवळपास सगळेच स्मार्टफोन वापरत आहेत. ते मोबाईल फोनशिवाय राहू शकत नाहीत. आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसाच तुमचा मोबाईल भिजला किंवा पाण्यात पडला तर तुम्हाला टेन्शन येते. लागली मोबाईलची वाट, अशीच प्रथम प्रतिक्रिया येते. पण तुम्हा घाबरुन जाऊ नका. काही सोप्या टिप्स वापरल्या आणि थोडीशी काळजी घेतली तरी नवीन खरेदी करण्याची गरज नाही.

| Jun 28, 2023, 15:19 PM IST
1/6

फोन ऑन करण्याची चूक करु नका

फोन ऑन करण्याची चूक करु नका

जर तुमचा फोन पावसात भिजला असेल किंवा पाण्यात पडला असेल तर काही टिप्स अवलंबल्या तर तुम्ही तुमचा फोन खराब होण्यापासून वाचवू शकता. अनेकदा अचानक पाऊस आल्याने मोबाईल भिजण्याची दाट शक्यता असते. जर तुमचा फोन पावसात ओला झाला किंवा फोनमध्ये पाणी गेले तर घाबरु नका. तुम्ही आधी तुमचा मोबाईल बंद करा. फोन ऑन करण्याची चूक करु नका.

2/6

इनबिल्ट बॅटरी : असा फोन बंद ठेवा आणि तो सुकवा

इनबिल्ट बॅटरी : असा फोन बंद ठेवा आणि तो सुकवा

 मोबाईल फोनच्या आत पाणी गेले असेल तर फोनची बॅटरी ताबडतोब बाहेर काढा. बॅटरी काढून टाकल्यानंतर, हँडसेटमधील बॅटरीच्या खाली एक छोटा स्टिकर चिकटवला जातो, जो बहुतेक फोनमध्ये पांढरा असतो. जर फोनच्या आत पाणी गेले असेल तर ते गुलाबी किंवा लाल रंगात बदलते किंवा फोनच्या आत थोडा ओलावा असेल तर या स्टिकरचा रंग बदलतो. तथापि, आता बहुतेक स्मार्टफोन इनबिल्ट बॅटरीसह येतात. या प्रकरणात बॅटरी काढणे शक्य नाही. असा फोन बंद ठेवा आणि तो सुकवण्याचा प्रयत्न करा.

3/6

फोन तांदळाच्या डब्यात ठेवा

फोन तांदळाच्या डब्यात ठेवा

पावसाच्या पाण्यातर तुमचा फोन पाण्यात भिजला असेल, तर कमीत कमी 24 तासांसाठी फोन तांदळाच्या डब्यात ठेवा. त्यामुळे तुमचा ओला फोन लवकर कोरडा होऊ शकतो. त्यामुळे शॉर्टसर्किट टळतो.

4/6

एका भांड्यात तांदूळ घेऊन, त्यात फोन ठेवा

एका भांड्यात तांदूळ घेऊन, त्यात फोन ठेवा

 तसेच आणखी एक पर्याय आहे. तुम्ही एका भांड्यात तांदूळ घेऊन, त्यात फोन ठेवा. नंतर हे भांडे प्रकाशात दोन दिवस ठेवा. पुरेशी उष्णता मिळाल्यामुळे फोन लवकर सुकू शकतो.

5/6

व्हॅक्युम क्लीनरचाही वापर करु शकता

व्हॅक्युम क्लीनरचाही वापर करु शकता

पाण्यात फोन भिजला असला असल्यास तुम्ही व्हॅक्युम क्लीनरचाही वापर करु शकता. व्हॅक्युम क्लीनरने तुम्ही फोन 20 ते 30 मिनिटांपर्यंत सुकवा. त्यामुळे फोनच्या आतील पाणी निघून जाईल आणि फोन लवकर सकण्यास मदत होईल. 

6/6

सर्व एक्सेसरीज बाजूला काढा आणि टिश्यू पेपर घ्या

सर्व एक्सेसरीज बाजूला काढा आणि टिश्यू पेपर घ्या

मोबाईल फोनच्या एक्सेसरीजमध्ये पाणी गेले असेल, तुम्ही सर्व एक्सेसरीज बाजूला काढा आणि टिश्यू पेपरने हलक्या हाताने कोरडे करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही यासाठी सॉफ्ट टॉवेलचाही वापर करु शकता.