PHOTO: 'सौरव गांगुलीसाठी महिला फक्त...', मोहम्मद शमीच्या पत्नीची सनसनाटी टीका, म्हणाली...

Hasin jahan Slam Sourav Ganguly : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. शमीची एक्स पत्नी हसीन जहाँ शमीवर वारंवार टीका करत असते. 

| Aug 22, 2024, 16:42 PM IST
1/5

हसीन जहाँ

हसीन जहाँ सोशल मीडियावर देखील अनेकदा चर्चेत असते. अनेक सामाजिक विषयांवर ती नेहमी भाष्य करताना दिसतेय. अशातच कोलकाता अत्याचार प्रकरणावर देखील तिने संताप व्यक्त केला होता. 

2/5

सौरव गांगुली

कोलकातामध्ये जे काही झालं ते चुकीचं आहे. पण संपूर्ण जगात अशा घटना घडत असतात. त्यासाठी संपूर्ण बंगालच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं चुकीचं असल्याचं सौरव गांगुलीने म्हटलं होतं.

3/5

गांगुलीला खडेबोल

सौरव गांगुलीच्या या वक्तव्यावर हसीन जहाँने जोरदार टीका केली. त्यावेळी शमीच्या एक्स पत्नी गांगुलीला चांगलेच खडेबोल सुनावले. 

4/5

गांगुली सारख्या लोकांसाठी...

सौरव गांगुली याच्यासारख्या लोकांसाठी महिला कदाचित एंटरटेनमेंट आणि मस्ती करण्याची गोष्ट असाव्यात, अशी टीका हसीन जहाँने केली आहे. 

5/5

क्रिकेटच्या दादावर टीका

सौरव गांगुलीने म्हणूनच म्हटलं बलात्कारासारख्या घटना संपूर्ण देशात होतात, असं म्हणत हसीन जहाँने क्रिकेटच्या दादावर टीका केली.