जोरदार पाऊस, Yellow Alert असतानाही CM शिंदे मोजक्या सुरक्षेसहीत 'वर्षा'बाहेर पडले अन्...

CM Eknath Shinde In Mumbai Monsoon: मुंबईसहीत महाराष्ट्रभरात मान्सून सक्रीय झाला असून पुढील काही दिवसांसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना हवामान विभागाने वेगवेगळे अलर्ट जारी केले आहेत. मुंबईतही यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळपासूनच मुंबईत पाऊस असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आज अचानक मोजक्या सुरक्षेसहीत भरपावसात घराबाहेर पडले. जाणून घ्या नेमकं कशासाठी शिंदे भरपावसात पडले घराबाहेर...

| Jun 25, 2023, 12:47 PM IST
1/8

CM Eknath Shinde In Mumbai Monsoon

मान्सूनचं मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये आगन झालं आहे. पुढील 48 तासांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. असं असतानाच आज सकाळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'वर्षा' बंगल्यातून बाहेर पडले ते थेट समुद्रकिनारी गेले.

2/8

CM Eknath Shinde In Mumbai Monsoon

मुख्यमंत्री शिंदेंबरोबर यावेळेस फारसे सुरक्षारक्षक नव्हते की त्यांचा मोठा ताफाही नव्हता. मात्र मुख्यमंत्री शिंदे असे ऑरेंज अलर्ट असताना मोजक्या सुरक्षेसहीत बाहेर का पडले?

3/8

CM Eknath Shinde In Mumbai Monsoon

मुख्यमंत्री शिंदेंनी आज अचानक केलेला हा दौरा खरं तर सप्राइज व्हिजीट होती. त्यांनी आज (25 जून 2023 रोजी) सकाळी मुंबईतील वरळी येथील कोस्टलमार्गाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट दिली.

4/8

CM Eknath Shinde In Mumbai Monsoon

वरळीमधील कोस्टल मार्गाचं बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणाची मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी केली. या भागात पावसाचे पाणी साचू नये, वाहतूककोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

5/8

CM Eknath Shinde In Mumbai Monsoon

त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे मुंबई उपनगरातील मिलन सबवेची पहाणी करण्यासाठी पोहोचले. दरवर्षी या ठिकाणी पाणी साचून वाहतूककोंडी होते. म्हणूनच शिंदे येथे पहाणीसाठी पोहोचले होते.

6/8

CM Eknath Shinde In Mumbai Monsoon

सध्या मिलन सबवे भागात पाणी साचलेले नाही, पावसाचे साठलेले पाणी टॅंकरमध्ये जमा करण्यासाठी स्टोरेज टॅंक ठेवण्यात आले आहेत. याचीच पहाणी शिंदेंनी केली. 

7/8

CM Eknath Shinde In Mumbai Monsoon

शिंदेंच्या या भेटीच्या वेळीही मिलन सबवेमध्ये सकाळपासून पाऊस पडूनही पाणी साचलं नव्हतं हे दाखवणारा फोटोही मुख्यमंत्री कार्यालयाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

8/8

CM Eknath Shinde In Mumbai Monsoon

मिलन सबवे भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदेंनी ही यंत्रणा कशी काम करते याबद्दलची माहिती दिली.