Most Expensive House in Mumbai: मुंबईतील सर्वात महागडी घरं, जाणून घ्या कोण आहेत मालक आणि घराची किंमत

Mumbai Most Expensive Homes: देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई (Mumbai). मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. घराच्या किंमतीने कोटीच्याकोटी उड्डाणं घेतली आहेत. जगातल्या महागड्या घरांपैकी (expensive Homes) काही घरं मुंबईत विकली गेली असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. देशातील सर्वात महागडं घर मुंबईतचं विकलं गेलं आहे. आपण आज नजर टाकूया मुंबईतल्या अशाच काही महागड्या घरांवर.

Mar 24, 2023, 13:12 PM IST
1/7

Antilia: मुकेश अंबानी

Antilia

मुंबईत सर्वात महागडं घर आहे ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचं. अंबानी यांच्या निवासस्थानाचं नाव एंटीलिया असं असून फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार एंटीलियाची किंमत जवळपास एक बिलियन डॉलर इतकी आहे. जगातील सर्वात महागड्या घरांपैकी हे एक घर आहे. एंटीलियामध्ये 27 मजले असून यात 9 हाय स्पिड लिफ्ट आहेत. घरात 168 कार राहू शकतात इतकं पार्किंग आहे. शिवाय 3 हेलीपॅड, एक  भव्य बॉलरुम, एक थिएटर, स्पासुद्धा आहे. 

2/7

Jatia House: कुमार मंगलम बिरला

Jatia House

आदित्या बिरला समूहाची चौथी पिढी कुमार मंगलम बिरला मुंबईतल्या अलीशान मलबार हिल इथल्या जाटिया हाऊसमध्ये राहातात. हे घर 28 हजार चौर मीटरमध्ये पसरलं आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 425 कोटी इतकी आहे.

3/7

Gulita: ईशा अंबानी और आनंद पीरामल

Gulita

मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि जावई आनंद पिरामल अलिशान बंगल्यात राहातात. 2012 मध्ये पिरामल कुटुंबाने 452 कोटी रुपयांना हा बंगला विकत घेतला. या बंगल्याचं नाव गुलिटा असं आहे. या बंगल्यात पाच मजले असून तीन बेसमेंट आहेत. 

4/7

Lincoln House: सायरस पूनावाला

Lincoln House

Expensive House in Mumbai: मुंबईतल्या 78 भूलाभाई देसाई रोडवर असलेलं लिंकन हाऊस हे सायर पूनावाला यांचं घर. या घराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहेत. वांकानेरचे महाराजा एचएच सर अमरसिंह बनसिंहजी आणि त्यांचे पूत्र प्रतातपसिंहजी यांच्यासाठी हा बंगला बनवण्यात आला होता. 2015 मध्ये सायरस पुनावाला यांनी हा बंगला 113 मिलियन डॉलरला हा बंगला विकत घेतला.

5/7

Mannat: शाहरुख खान

Mannat

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा मुंबईतला मन्नत बंगला चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. मुंबईतल्या बँडस्टँड परिसरात असलेला या बंगल्याची किंमत 200 कोटी रुपये इतकी आहे. सहा मजल्यांचा हा बंगला असून याला मोठी गॅलरी आहे. याशिवाय एक थिएटरदेखील आहे. 

6/7

रतन टाटा

Ratan TATA House

टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचा मुंबईतल्या कुलाबा इथं अलिशान बंगला आहे. रतन टाटा यांच्या बंगल्याची किंमत 150 कोटी रुपये इतकी असून जवळपास 13,350 चौरस मीटर इतकं या बंगल्याचं क्षेत्रफळ आहे. 

7/7

Jalsa: अमिताभ बच्चन

Jalsa

बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता रमेश सिप्पी यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांना जलसा हा बंगला भेट म्हणून दिला होता. या बंगल्याची किंमत 112 कोटी रुपये इतकी आहे.