देशातील 'या' राज्यात राहतात सर्वाधिक शाकाहारी लोक

भारतात मांसाहार करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पण तुम्हाला कोणत्या राज्यात सर्वात जास्त शाकाहारी लोक राहतात हे माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर

| Aug 13, 2024, 13:08 PM IST
1/6

मांसाहार करणाऱ्यांची संख्या

भारतात मांसाहार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, देशातील कोणत्या राज्यात सर्वात कमी मांसाहार करणारे लोक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? 

2/6

शाकाहारी लोक

परंतु कोणत्या राज्यात शाकाहारी लोकांची संख्या सर्वाधिक आहे आणि या शहरांमध्ये मांसाहारी करणारे लोक शोधणे कठीण काम आहे. 

3/6

उत्तर आणि मध्य भारत

देशात सर्वाधिक शाकाहारी लोकांची संख्या ही उत्तर भारत आणि मध्य भारतात आहे. या पैकी एका राज्यात सर्वात जास्त शाकाहारी लोक आहेत. 

4/6

हरियाणा

हरियाणामध्ये सर्वात जास्त शाकाहारी लोक आहेत. येथील 80 टक्के महिला आणि 56 टक्के पुरुषांनी कधीही मांस खाल्ले नाही. 

5/6

राजस्थान

त्यानंतर राजस्थान हे दुसरे राज्य आहे जिथे मांसाहार करणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे. येथे 75 टक्के महिला आणि 63 टक्के पुरष शाकाहारी आहेत. 

6/6

सर्वेक्षण

गेल्या काही वर्षांमध्ये देशात मांसाहार करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.