Mothers Day 2024 : 'ईश्वराचे रुप असते आई'; मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Mothers Day Wishes in Marathi : प्रत्येकाला आपल्या आईसाठी 'मदर्स डे' हा दिवस स्पेशल बनवायचा असतो. तर या 'मदर्स डे'च्या दिवशी तिला खास शुभेच्छा पाठवा. 12 मे रोजी जगभरात मदर्स डे साजरा केला जातो.
तसं पाहिलं तर आईसाठी एकही दिवस कधीच पुरेसा नसतो. ज्या व्यक्तीने आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं तिच्यासाठी एक दिवस कसा पुरेसा पडेल? पण तरीही 12 मे हा दिवस "जागतिक मातृ दिवस' म्हणून साजरा केला जातो.आईसाठी 'मदर्स डे' ही ती संधी आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या आईसाठी काही वेळ काढू शकता आणि तिला खूप आनंद देईल असे काहीतरी करू शकता. मातृदिन दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी मदर्स डे 12 मे रोजी येत आहे. अशा परिस्थितीत, आपल्या आईसाठी हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी, तिला खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवा.