स्मार्टफोन आहे की च्युईंग गम? कसाही वाकवा मोटोरोलाचा फोन

वाकेल पण मोडणार नाही हे म्हणणे मोटोरोलाच्या नव्या फोनला लागू होते. बेंड होणारा, घड्याळाप्रमाणे घालता येणारा फोन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. 

| Feb 27, 2024, 16:54 PM IST

Motorola Bendable Phone: वाकेल पण मोडणार नाही हे म्हणणे मोटोरोलाच्या नव्या फोनला लागू होते. बेंड होणारा, घड्याळाप्रमाणे घालता येणारा फोन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. 

1/8

वाकेल पण मोडणार नाही! मोटोरोलाचा बेंड होणारा, घड्याळाप्रमाणे घालता येणारा फोन

Motorola Bendable Phone Features Price

Motorola Bendable Phone: मोटोरोलाच्या फोनने सर्वच मोबाईल यूजर्सना आश्चर्यचकित केले आहे. हा एक असा फोन आहे जो वाकू शकतो तसेच दुमडला देखील जाऊ शकतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. 

2/8

मोटोरोलाची करामत

Motorola Bendable Phone Features Price

आपण आपल्या आवडीच्या कोणत्याही आकारात वाकवू शकू असा फोन तुम्ही कधी पाहिलाय का? एखाद्या भविष्यकालीन चित्रपटासारखे हे भासेल पण मोटोरोलाने ही करामत करुन दाखवली आहे. 

3/8

हवा तो आकार द्या

Motorola Bendable Phone Features Price

मोटोरोलाचा हा नवीन फोन एखाद्या जादूसारखा भासेल. तुम्ही हा फोन वाकवून तुम्हाला हवा तो आकारही देऊ शकता. तुम्हाला वाटले तर सरळ ठेवा किंवा फोन फोल्ड करुन वापरा. हा फोन प्रत्येक प्रकारे काम करतो. या तंत्रज्ञानामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटतंय. 

4/8

स्मार्टफोन बनेल घड्याळ

Motorola Bendable Phone Features Price

मोटोरोलाचा फोन वेगवेगळ्या प्रकारे फोल्ड करू शकतो. त्यामुळे सर्व प्रकारे याचा वापर करता येऊ शकतो. याची खास गोष्ट म्हणजे हातातील घड्याळाप्रमाणे तो  मनगटाभोवती गुंडाळला जाऊ शकतो. ज्यामुळे तो 6.9 इंचाचे स्मार्टवॉच बनून जातो. 

5/8

फोन वाकवून स्टँड बनवा

Motorola Bendable Phone Features Price

फोनमध्ये गेम खेळण्यासाठी "टेंट मोड" आणि व्हिडिओ पाहण्यासाठी "स्टँड मोड" (ज्यामध्ये फोन थोडासा वाकवून स्टँड बनवता येतो). सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोनची स्क्रीन आपोआप वक्रानुसार बदलते. ज्यामुळे ॲप्स आणि फंक्शन्स सहज ऑपरेट करता येतात.

6/8

स्टायलिश केशरी रंगाचे कापड

Motorola Bendable Phone Features Price

या फोनच्या मागील बाजूस एक स्टायलिश केशरी रंगाचे कापड आहे आणि तो पडू नये म्हणून मनगटावर एक चुंबक आहे. फोन घड्याळासारखे मनगटावर घालणे फॅशनेबल वाटू शकते. असे असले तरी ते किती आरामदायक आहे आणि दीर्घकाळ परिधान केले जाऊ शकते का? हा प्रश्नच आहे. 

7/8

बॅटरीचा जास्त वापर होईल

Motorola Bendable Phone Features Price

मोटोरोलाचा हा फोन दिसायला खूप भारी वाटत असला तरी सतत फोल्ड केल्याने त्याने अडचणी येऊ शकतात. फोन वारंवार वाकल्यामुळे कमकुवत होऊ शकतो तसेच तुटण्याचीही शक्यता असते.

8/8

बॅटरी लवकर संपेल

Motorola Bendable Phone Features Price

मोटोरोला फोन फोल्ड करण्याच्या जटिल पद्धतीमुळे, त्याचे आयुष्य कमी होऊन जाते. तसेच अशा तंत्रज्ञानाला जास्त बॅटरी लागते. ज्यामुळे एकतर बॅटरी लवकर संपेल किंवा फोन खूप जड होईल.