काल गोलंदाजीनं मैदान गाजवलं अन् दुसऱ्याच दिवशी जगाला अलविदा; टी-20 वर्ल्डकपपूर्वी इंग्लडच्या खेळाडूचं निधन

Josh Baker Passed Away: क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर आला आहे. वयाच्या 20 व्या वर्षी एका युवा खेळाडूचं निधन झालं आहे. 

| May 03, 2024, 09:05 AM IST
1/7

इंग्लंडचा युवा क्रिकेटपटू जॉस बेकर यांच निधन झालं. दरम्यान त्याच्या मृत्यूचं कारण उघड केलेलं नाही

2/7

मृत्यूच्या एक दिवस अगोदर त्याने त्याच्या गोलंदाजीने चांगला खेळ केला होता. जोस बेकर वूस्टरशायर टीमकडून खेळला. 

3/7

जॉस फिरकी गोलंदाज होता. या डावखुऱ्या फिरकीपटूने 2021 मध्ये वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी पहिला करार केला होता.

4/7

या खेळाडूचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये या खेळाडूने निधनाच्या एक दिवस आधी खेळताना 3 विकेट घेतल्या होत्या.

5/7

या युवा खेळाडूच्या मृत्यूने संपूर्ण क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. 

6/7

जॉस बेकरने 22 प्रथम श्रेणी सामने खेळले. तो इंग्लंडच्या अंडर-19 टीमचाही एक भाग होता.

7/7

बेकरने आपल्या प्रथम श्रेणीच्या कारकिर्दीत 43 विकेट घेतल्या आणि 411 रन्स केलेत. ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.