PHOTO : 9.46 लाख कोटींचे मालक मुकेश अंबानी यांचे Best Friend कोण? 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींशी त्यांची घट्ट मैत्री

Mukesh Ambani Best Friends : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी अंबानी कुटुंब सध्या इटलीमध्ये आहे. या सोहळ्यात अंबानी कुटुंबाच्या जवळचे बॉलिवूड स्टार्स परदेशात आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की मुकेश अंबानी यांचं कोणत्या 10 बॉलिवूड लोकांशी घट्ट मैत्री आहे? 

Jun 01, 2024, 15:45 PM IST
1/9

मुकेश अंबानी हे जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत असून फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार अंबानी कुटुंबाची संपत्ती 9.46 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. सध्या या कुटुंबामध्ये लगीन घाई असून अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या दुसरा प्री-वेडिंग फंक्शनची इटलीमध्ये धूम सुरु आहे.   

2/9

शाहरुख खान हे अंबानी कुटुंबाच्या सर्वात जवळचा मानला जातो. ईशा आणि आकाश यांच्या लग्नातही शाहरुख आणि गौरी खान घरातील एक सदस्यासारखे सोहळ्यातील व्यवस्था पाहत होते.     

3/9

त्यातील दुसरं नाव आहे सलमान खान. अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी सलमान इटली आहे. त्यापूर्वी तो जामनगरलाही गेला होता. सलमान खान आणि अंबानी कुटुंब एकमेकांच्या सुख दु:खात कायम सोबत असतात.   

4/9

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना अंबानी कुटुंबातील छोट्या-मोठ्या कुठल्याही सोहळ्यात तुम्ही यांना पाहिलंय. खरंतर रणबीर आणि आकाश अंबानी खूप चांगले मित्र आहेत. तर श्लोका आणि आलिया यांच्यातील बंधही खूप घट्ट आहे. 

5/9

या यादीत महत्त्वाच नाव म्हणजे अमिताभ बच्चन. राम मंदिराचं उद्घाटन असो किंवा घरातील कोणत्याही सोहळा असतो बिग बी अंबानी कुटुंबासोबत खांद्याला खांदा लावून उभे असतात. अमिताभ बच्चन कुटुंब आणि अंबानी कुटुंब खूप जवळ आहेत. अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्यासोबत बिग बींचे नातेही घट्ट आहे. 

6/9

बॉलिवूडमधील तिसरा खान आमिर खानही अंबानी कुटुंबाच्या पार्ट्यांमध्ये पाहिला मिळतो. एकदा आमिर खान अंबानी कुटुंबाबाबत म्हणाला होता की, तो अगदी त्याच्या कुटुंबासारखाच आहे. अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक सोहळ्यात तो उपस्थितीत असतो. 

7/9

प्रियांका चोप्रा ही नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीची बेस्ट फ्रेंड असल्याने प्रियांका त्यांच्या घरातील सोहळ्यात दिसून येते. जेव्हा प्रियांकाचे लग्न झालं होतं, तेव्हा ईशा स्वतः या कार्यक्रमात गेली होती. प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्रासुद्धा इशाची चांगली मैत्रिण आहे. 

8/9

कियारा आडवाणी आणि ईशा अंबानीची या बालपणीच्या मैत्रिणीन आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबातील प्रत्येक सोहळ्यात ती खास करुन उपस्थितीत असते. 

9/9

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे नातेही अंबानी कुटुंबाच्या अतिशय घट्ट आहे. सैफलाही क्वचितच कोणत्याही पार्टीत किंवा कार्यक्रमात जाणे आवडतं. पण अंबानी कुटुंबाशी असलेल्या मैत्रीमुळे तो संपूर्ण कुटुंबासह त्या घरातील प्रत्येक सोहळ्याला आवर्जुन उपस्थिती लावतो.