Bhanushali building collapses : आम्हाला बाहेर काढा; नागरिकांची विनवणी

Jul 16, 2020, 17:59 PM IST
1/5

Bhanushali building collapses : आम्हाला बाहेर काढा; नागरिकांची विनवणी

मुंबईतील फोर्ट परिसरात जीपीओसमोर असणारी भानुशाली इमारत गुरुवारी दुपारच्या सुमारास कोसळली. पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळं या परिसरात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. 

2/5

Bhanushali building collapses : आम्हाला बाहेर काढा; नागरिकांची विनवणी

भानुशाली इमारतीचा जवळपास ४० टक्के भाग कोसळल्याची माहिती समोर येत आहे. इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळं ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

3/5

Bhanushali building collapses : आम्हाला बाहेर काढा; नागरिकांची विनवणी

सध्याच्या घडीला घटनास्थळी अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिका, पोलीस कर्मचारी यांनी युद्धपातळीवक बचावकार्यास सुरुवात केली आहे.  

4/5

Bhanushali building collapses : आम्हाला बाहेर काढा; नागरिकांची विनवणी

दरम्यान, संबंधित इमारत ही म्हाडाची सेस इमारत असल्याची माहिती समोर येत आहे. इमारतीचा एक भाग कोसळला असला तरीही दुसरा भाग मात्र पूर्णत: शाबूत आहे. 

5/5

Bhanushali building collapses : आम्हाला बाहेर काढा; नागरिकांची विनवणी

सध्या इमारतीच्या इरलेल्या भागालाही धोका असल्यामुळं तेथे राहणाऱ्या रहिवाशांनी आम्हाला बाहेर काढा, अशी विनवणी केल्याचं पाहायला मिळालं. या इमारतीला असणारा मोठा धोका पाहता बचाव कार्यातील यंत्रणांकडून आता या रहिवाशांनाही बाहेर काढण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. (सर्व छायाचित्रे- एएनआय)