मुंबईकरांचा खोळंबा करणारी बातमी; 'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, 704 बस आगारातच

Mumbai Best Strike : तुमचाआमचा प्रवास सुकर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर का आली संप करण्याची वेळ? पाहा...   

Aug 07, 2023, 07:31 AM IST

Mumbai Best Strike : मुंबई लोकलला ज्याप्रमाणं शहराची लाईफलाईन म्हटलं जातं. त्याचप्रमाणं महत्त्वं मिळतं ते म्हणजे बेस्ट बसना. पण, आता मात्र मुंबईकरांपुढं याच बेस्टमुळं अडचणी उभ्या राहताना दिसत आहेत. 

1/7

Mumbai Best Strike

Mumbai best Bus Strike enters on its sixth day 704 buses off roads

Mumbai Best Strike : बेस्ट बसनं प्रवास करून अपेक्षित स्थळी पोहोचणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठी. कारण, याच बेस्टमुळं आज किंबहुना पुढील काही दिवस तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

2/7

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप

Mumbai best Bus Strike enters on its sixth day 704 buses off roads

कारण ठरतंय ते म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप. 'बेस्ट' कडून नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सहा दिवसांपूर्वी संपाची हाक दिली ज्यानंतर हा संप अद्यापही निकाली निघालेला नाही, 

3/7

मुंबईकर

Mumbai best Bus Strike enters on its sixth day 704 buses off roads

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्यामुळं मुंबईकर प्रवाशांना मात्र प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. 

4/7

बसची संख्या कमी

Mumbai best Bus Strike enters on its sixth day 704 buses off roads

शहरातील रस्त्यांवर बसची संख्या कमी असल्यानं बस थांब्यांवर प्रचंड गर्दी दिसतेय पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी प्रवाशांच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत. 

5/7

प्रवाशांपुढं अडचणी

Mumbai best Bus Strike enters on its sixth day 704 buses off roads

काहीजणांना अपेक्षित वेळापेक्षा जास्त वेळ प्रवासावरच खर्ची घालावा लागत असल्यामुं महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येत आहेत. तर, काहींना जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागतोय.

6/7

18 आगारांमधील बससेवा प्रभावित

Mumbai best Bus Strike enters on its sixth day 704 buses off roads

शहरातील 27 बस आगारांपैकी तब्बल 18 आगारांमधील बससेवांवर या संपाचा परिणाम झाला असून, या संपाच्या निमित्तानं कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ आणि बेस्टच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांच्या सुविधा लागू व्हाव्यात अशा मागण्या केल्या आहेत.   

7/7

काय आहेत संपाची कारणं?

Mumbai best Bus Strike enters on its sixth day 704 buses off roads

मागील तीन वर्षांमध्ये पगारात समाधानकारक वाढ न झाल्यामुळं कुटुंबाचा उदरनिर्वाह करणंही कठीण झाल्याचं म्हणत या कर्मचाऱ्यांनी संबंधित यंत्रणांसमोर त्यांच्या मागण्या उचलून धरल्या आहेत. त्यामुळं आता हा संप नेमका निकाली कधी निघणार याकडे कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांच्याही नजरा लागल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंदोलनकर्ते सोमवारी भेटून त्यांच्याकडे मागण्या आणि संपा बाबत चर्चा करणार आहेत.(सर्व छायाचित्र- पीटीआय)