मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कुर्ला-घाटकोपरमध्ये बनणार 3.5 किमीचा पूल

Mumbai Traffic Jam : मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून विविध ठिकाणी नवीन पूल, मार्ग आणि मेट्रो सेवा सुरू करण्यात येत आहेत. मात्र, अरुंद रस्त्यामुळे एलबीएस मार्गावर अजूनही वाहतूक कोंडी होत आहे. हे लक्षात घेऊन एलबीएसवार यांनी मोठा पूल बांधण्याचा निर्णय घेतला.  

Mar 11, 2024, 12:51 PM IST
1/7

मुंबईतील लाल बहादूर शास्त्रीय मार्ग म्हणजेच एलबीएसवर नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत. हा मार्ग मुंबईच्या पूर्व उपनगरातून जात असल्याने अनेक लोक येथे स्थलांतर करतात. मात्र, रस्ता अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याच वाहतूक कोडींवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

2/7

एलबीएस मार्गावरील वाहतुक कोंडीवर तोडगा म्हणून कुर्ल्यातील कल्पना टॉकीज ते घाटकोपर येथील सर्वोदय हॉस्पिटलदरम्यान साडेतीन किलोमीटर लांबीचा पूल बांधण्याची योजना पालिकेने आखली आहे.  BMC येत्या महिन्यात पूल बांधण्यासाठी टेंडर काढणार आहे.   

3/7

गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. हा परिसर नौदलाचा भाग असल्याने एनओसी मिळत नव्हती. बीएमसी आणि नौदलातील बैठक संपल्यानंतरच पूल बांधण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. एवढेच नाही तर पूल 700 मीटरने वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

4/7

घाटकोपर-अंधेरी रस्त्यावर हा पूल जोडला जाणार आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल आणि त्याचा फायदा वाहनचालकांना होईल. पूल तयार झाल्यानंतर केवळ कुर्ला ते घाटकोपरचच नव्हे तर त्यापुढील परिसरातही वाहतूक कोंडी होणार नाही. 

5/7

मुंबईचा पूर्व उपनगरी LBS मार्ग सायनपासून सुरू होतो आणि मुलुंड, ठाण्यापर्यंत पोहोचतो. फिनिक्स मार्केटसिटी मॉलपासून एलबीएस मार्गरूनचा रस्ता साकीनाका आणि अंधेरीला जोडतो. 

6/7

कुर्ल्यातील कल्पना टॉकीजची येथीन वाहतूक सुरु होते. परिणामी या मार्गिकेवर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.   

7/7

मुंबईकरांची वाहतूक कोंडींची समस्या पाहूनच मुंबई महापालिकेने साडेतीन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.