World Cup 2023 आणि Chandrayaan-3 चं कनेक्शन काय? मुंबई इंडियन्सने केली मोठी भविष्यवाणी!

Mumbai Indians BIG Prediction: संपूर्ण भारतामध्ये उत्सवाचे वातावरण असताना, सोशल मीडिया वापरकर्ते वेगळ्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त करत आहेत. अशातच आता चांद्रयानाचं वर्ल्ड कप (CWC23) कनेक्शन समोर आलंय.

Aug 23, 2023, 23:58 PM IST

Chandrayaan-3 : भारताच्या इतिहासात 23 ऑगस्ट हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. आज भारतीय शास्त्रज्ञांनी ते करून दाखवले आहे जे जगातील मोठे देशही करू शकले नाहीत. आज इस्रोचे चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं.

1/6

World Cup 2023 आणि Chandrayaan-3 चं कनेक्शन काय? मुंबई इंडियन्सने केली मोठी भविष्यवाणी!

2/6

दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चं यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच पाच वेळा आयपीएल चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सने मोठा अंदाज वर्तवला आहे.  

3/6

2019 मध्ये चांद्रयान-2 मोहीम यशस्वी झाली नव्हती. त्यानंतर श्रीहरिकोटा येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रो प्रमुखांची शिवन यांना मिठी मारल्याचा फोटो सर्वांना आठवत असेल.

4/6

याच वर्षी भारत 2019 चा एकदिवसीय विश्वचषक खेळला आणि त्याला विजेतेपद मिळवता आलं नाही.

5/6

आता 2023 चांद्रयान-३ यशस्वीपणे उतरलं आहे आणि यंदाच्या वर्षी वर्ल्ड कप देखील खेळवला जाणार आहे.

6/6

या चित्रांच्या सहाय्याने मुंबई इंडियन्स संघाने 'लोडिंग'चा इमोजी शेअर केलाय. आता पुढे पाहूया की 2023 मध्ये टीम इंडिया वर्ल्ड कपमध्येही यशस्वी होऊ शकेल का?