चांद्रयानाने पाठवला चंद्राचा पहिला फोटो, चंद्राची दक्षिण ध्रुवावरची EXCLUSIVE दृश्य

ISRO: चंद्रावर यशस्वीपणे उतरताच चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ने आपलं कामसुरु केलं आहे. चांद्रयानने चंद्रावरचा पहिला फोटो इस्त्रोला (ISRO) पाठवला आहे. इस्त्रोने हे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. चंद्राची दक्षिण ध्रुवावरची पहिली EXCLUSIVE दृश्य पाहिला मिळाली आहेत. 

| Aug 23, 2023, 21:49 PM IST
1/7

चंद्रावर भारताचा विक्रम लँडर यशस्वीरित्या उतरला आणि भारताने अंतराळ क्षेत्रात नवा विक्रमही रचला.  आता चांद्रयानाने चंद्राचा पहिला फोटो पाठवला आहे. चांद्रयान दक्षिण ध्रुवावर ज्या जागेवर उतरलं त्या जागेचा फोटो चांद्रयानाने इस्त्रोला पाठवला आहे. हा फोटो इस्त्रोने एक्सवर पोस्ट केलाय. चंद्राची दक्षिण ध्रुवावरची ही पहिली EXCLUSIVE दृश्य आहेत.. कारण याआधी कोणताही देश दक्षिण ध्रुवावर उतरू शकला नव्हता. मात्र भारताने ही कामगिरी करुन दाखवलीय.

2/7

इस्त्रोने शेअर केलेल्या ट्विटमध्ये चांद्रयान-3 आणि MOX-ISTRAC असं म्हटलं आहे. चंद्रावर उतरताना लँडर  हॉरिजॉन्टल वेलोसिटी कैमरे हे फोटो काढण्यात आले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.   

3/7

चांद्रयान चंद्रावर पोहोचताच काही क्षणातच त्यानं पहिला मेसेज भारतासाठी पाठवलाय. 'भारतीयांनो, मी माझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचलो' 'आणि तुम्हीसुद्धा तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचलात' असा मेसेज चांद्रयानानं केलाय. चांद्रयानानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरुन इतिहास रचलाय. 

4/7

भारताचं चांद्रयान 3 यशस्वी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शास्त्रज्ञांसह सर्व देशवासीयांचं अभिनंदन केलंय. हे यश शास्त्रज्ञांच्या मेहनतीचं आणि भारतीय जनतेचं असल्याचं मोदी म्हणाले. भारतानं रचलेल्या या इतिहासाचा क्षण अविस्मरणीय आहे. आधी आपण लहान मुलांना शिकवायचो चंदामामा दूर आहे. आता शिकवुया चंदामामा एक टूर आहे. असं मोदी म्हणालेत.

5/7

इस्रोमधल्या शास्त्रज्ञांनी गेले कित्येक महिने चांद्रयानासाठी मेहनत केली. इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली इस्रोनं या मोहिमेसाठी काम केलं. चांद्रयानाचे प्रोजेक्ट डायरेक्टर पी. वीरामुथूवेल, असोसिएट डायरेक्टर कल्पना, मिशन ऑपरेशन डायरेक्टर श्रीकांत आणि सॅटेलाईट ऑपरेटर शंकरन यांचं सोमनाथ यांनी अभिनंदन केलं.   

6/7

या यशस्वी कामगिरीनंतर इस्रोच्या टीमनं जोरदार जल्लोष केला. गेल्या काही दिवसांपासून इथले सगळे शास्त्रज्ञ चांद्रयान अक्षरशः जगत होते.   देशातच नाही तर परदेशातही भारतीयांनी जल्लोष साजरा केला.

7/7

भारताच्या यशाबद्दल नासानं एक्सवरून शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करणारा भारत चौथा देश ठरलाय. चांद्रमोहिमेत सहभागी झालेल्या सहका-याचं स्वागत आहे असं नासाने म्हंटलंय.