GT vs MI Qualifier 2: रोहित अँड कंपनीला 'या' 5 खेळाडू रहावं लागेल सावध; नाहीतर फायलनआधीच खेळ खल्लास!

Gujarat Titans vs Mumbai Indians: क्वॉलिफायरच्या दुसऱ्या सामन्यात (IPL 2023 Qualifier 2) गुजरात मुंबईचा गेम करून फायनल (IPL 2023 Final) गाठणार की घरच्या मैदानावर मुंबई गुजरातला आहेर देऊन फायनलमध्ये धडक मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित अँड कंपनीला 5 खेळाडू सावध रहावं लागेल. 

May 26, 2023, 10:59 AM IST

GT vs MI Qualifier 2: आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामातील क्वॉलिफायरचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात खेळवला जाणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे. त्यामुळे आता गुजरात मुंबईचा गेम करून फायनल गाठणार की घरच्या मैदानावर मुंबई गुजरातला आहेर देऊन फायनलमध्ये धडक मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित अँड कंपनीला 5 खेळाडू सावध रहावं लागेल. 

1/5

शुभमन गिल

शुभमन गिल (Shubhman Gill) सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. शुभमनची विकेट म्हणजे मुंबईचं अर्ध काम सोपं होईल. त्यामुळे आकाश मधवाल या खेळाडूच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी असेल.

2/5

डेव्हिड मिलर

मोक्याच्या क्षणी गुजरातला पुन्हा सामन्यात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तो डेव्हिड मिलर (). डेव्हिड मिलरने यंदाच्या आयपीएलमध्ये नावाला साजेशी भलीमोठी कामगिरी केली नाही. मात्र, महत्त्वाच्या सामन्यात मिलर समोरच्या संघासाठी किलर ठरू शकतो.

3/5

राशिद खान

करामती खान म्हणजे राशिदने यंदाच्या आयपीएलमध्ये आपला फॉर्मची झलक पुन्हा एकदा दाखवून दिलीये. बॉलिंगमध्ये तो कलामत दाखवतोय यात कोणताही वाद नाही. पण फलंदाजी करताना तो सेहवाग फॉर्मध्ये आल्याचं दिसतोय.

4/5

नूर अहमद

राशीद खान आणि नूर अहमद ही अफगाणी जोडी गुजरातसाठी गोल्डन स्टोन ठरतीये. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीन या खेळाडूंसाठी पांड्या हे अस्त्र बाहेर काढू शकतो.

5/5

मोहम्मद शमी

पंधरा सामन्यांमध्ये प्रत्येकी 17.38 धावांत 26 विकेट्स घेऊन मोहम्मद शमी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे मोहम्मद शमी हा मुंबईसाठी काळघारी ठरू शकतो.