म्हाडाची घरं झाली स्वस्त, नव्या किंमती पाहिल्यात का? अर्ज भरला नसेल तर घाई करा

Mhada Home : मुंबईत म्हाडाचं घर घेणा-यांसाठी आनंदाची बातमी.. म्हाडाच्या घरांच्या किंमतीत कपात करण्यात आलीये. मुंबई मंडळाच्या सोडतीतील 370 घराच्या किंमतीमध्ये 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिलीये.

| Aug 29, 2024, 20:04 PM IST
1/7

म्हाडाची घर झाली स्वस्त, नव्या किंमती पाहिल्यात का? अर्ज भरला नसेल तर घाई करा

2/7

मुंबईत म्हाडाच्या 2030 घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे.  पण म्हाडाच्या घरांच्या किंमती भरमसाठ असल्यानं मुंबईकरांनी याकडं पाठ फिरवली होती. खूपच कमी अर्ज आल्यानं आता म्हाडानं नोंदणीला मुदतवाढ दिली असून घरांच्या किंमतीही कमी केल्या आहेत. 

3/7

आता मुंबईत म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. म्हाडाच्या घरांच्या किंमतीत कपात करण्यात आलीये. मुंबई मंडळाच्या सोडतीतील 370 घराच्या किंमतीमध्ये 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिलीये.

4/7

म्हाडानं मुंबई मंडळाच्या घरांच्या अर्जविक्री-स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ दिलीये.. आता 4 सप्टेंबर ऐवजी इच्छुकांना 19 सप्टेंबरला अर्ज सादर करता येणार आहे. 

5/7

त्यामुळे 13 सप्टेंबरच्या सोडतीची तारीख लांबणीवर केली असून लवकच नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे.    

6/7

अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 25 टक्क्यांनी, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 20 टक्क्यांनी, तर मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. 

7/7

उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे अतुल सावे यांनी सांगितलं. यानुसार सुधारित किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत