Ambani Family Education Details : सासू Nita पासून सून Radhika पर्यंत,  Ambani कुटुंबातील लेकीसुना किती शिक्षित आहेत ते जाणून घ्या

Ambani Family Educational Qualification  : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाबद्दल  जाणून घ्यायला सर्वसामान्य लोकांना खूप आवडतं. अंबानी कुटुंबातील नीता अंबानी, ईशा अंबानी, श्लोका मेहता आणि राधिका मर्चंट याबद्दल तर रोज काही नाही शोधलं जातं. आता या महिलांचे शिक्षण किती झाले आहेत, ते आपण जाणून घेणार आहेत. 

Jan 31, 2023, 12:48 PM IST

Radhika Shloka Isha Nita Ambani Education :  मुंबईतील आणि देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी हे जगात जेवढे प्रसिद्ध आहे. तेवढं त्यांचं संपूर्ण कुटुंब सोशल मीडियावर फ्रेमस आहे. या कुटुंबाबद्दल आणि त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांबद्दल गुगलवर रोज प्रत्येक क्षणाला अनेक गोष्टी सर्च होतं असता. या कुटुंबातील महिलांबद्दल जाणून घ्यायला सर्वसामान्यांना खूप आवडतं. आज आपण या कुटुंबातील सासू नीतापासून धाकट्या सूनबाई राधिकापर्यंत या किती सुशिक्षित आहेत ते जाणून घेऊया. (mumbai Mukesh Ambani nita ambani isha ambani shloka mehta radhika merchant find out how educated or education women in the Ambani family are)

1/4

नीता अंबानी

nita ambani

अंबानी कुटुंबातील मोठा सूनबाई म्हणजे मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मुंबईच्या नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून कॉमर्समध्ये पदवी घेतली आहे. त्या एक भरतनाट्यम नृत्यांगनादेखील आहेत

2/4

ईशा अंबानी

isha ambani

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने येल युनिव्हर्सिटी, यूएसए मधून मानसशास्त्रात पदवी घेतली आहे.  त्यानंतर कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले.  

3/4

श्लोका मेहता

shloka mehta

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मोठी सून श्लोका मेहता हिने प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, न्यू जर्सी (यूएसए) मधून मानववंशशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. शिवाय श्लोका मेहता यांना सामाजिक कार्य करायलाही आवड आहे. 

4/4

राधिका मर्चेंट

radhika merchant

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची धाकटी सून राधिका मर्चंटने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूल आणि बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून झालं. यानंतर त्यांनी 2017 मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेतली.