मुंबईकर महिलेला 5 वेळा आला हार्ट अटॅक! झाल्या 6 Angioplasty; डॉक्टर म्हणतात, 'समस्येचं कारण..'

5 Heart Attacks In 16 Months: एखाद्याला हार्ट अटॅक आला म्हटलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. मात्र मुंबईतील मुलुंडमधील एका 51 वर्षीय महिलेला मागील 16 महिन्यांमध्ये तब्बल 5 वेळा हार्ट अटॅक आला आहे. या महिलेला नेमकं काय झालं आहे आणि त्याबद्दल डॉक्टरही का संभ्रमात आहेत जाणून घ्या...

| Dec 07, 2023, 14:14 PM IST
1/10

5 Heart Attacks In 16 Months

मुलुंडमधील ज्या महिलेला 5 वेळा हार्ट अटॅकचा झटका आला आहे तिच्या हृदयामध्ये 5 स्टेन बसवण्यात आल्या आहेत. तिच्यावर अँजिओप्लास्टीच्या 6 सर्जरी झाल्या आहेत. तसेच एक बायपास सर्जरीही झाली आहे.

2/10

5 Heart Attacks In 16 Months

डिसेंबर 1 आणि 2 तारखेला हृदयाची तपासणी करण्यासाठी लॅबमध्ये जाऊन आल्यानंतर या महिलेने माझ्यात नेमका काय दोष आहे हे मला जाणून घ्यायचं आहे, असं म्हटलं आहे. "माझ्याबरोबर असं का घडतंय हे मला जाणून घ्यायचं आहे. पुढल्या 3 महिन्यात माझ्या हृदयात नवीन ब्लॉक तयार होईल," असं या महिलेने म्हटलं आहे. (प्रातिनिधिक फोटो)

3/10

5 Heart Attacks In 16 Months

जयपुरवरुन बोरिवलीला येत असतानाच 2022 साली सप्टेंबर महिन्यात ट्रेनमध्ये या महिलेला पहिला हार्ट अटॅक आला होता. तिला अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलं होतं.

4/10

5 Heart Attacks In 16 Months

"आम्ही तिथून अँजिओप्लास्टीसाठी मुंबईला आलो," असं या महिलेने 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं. ती सध्या मुलुंडमधील फोर्टीस रुग्णालयामध्ये आहे.

5/10

5 Heart Attacks In 16 Months

"या महिला रुग्णाला हृदयासंदर्भातील या समस्येचं कारण समजलेलं नाही. या समस्या कशामुळे निर्माण झाल्यात हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही," असं डॉ. हसमुख रावत यांनी सांगितलं आहे. जुलै महिन्यापासून डॉ. हसमुख रावत हे या महिलेचे कार्डिओलॉजिस्ट आहेत. जुलैच्या आधीच या महिलेवर 2 अँजिओप्लास्टी आणि एक बायपास सर्जरी झाली आहे.

6/10

5 Heart Attacks In 16 Months

या महिलेने अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. यामधून हा शरीराअंतर्गत रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित विकारांमुळे होत असलेला त्रास असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या महिलेच्या हृदयामधील रक्त वाहिन्या अचानक आक्रसल्याने हा त्रास होत असणार. मात्र चाचण्यांमधून अद्याप कोणतंही निदान झालेलं नाही.

7/10

5 Heart Attacks In 16 Months

काही महिन्यांनी नेहमी या महिलेला छातीत दुखण्याचा, डेकरांचा आणि शुद्ध हरपण्याचा त्रास होतो आणि तिला डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते.

8/10

5 Heart Attacks In 16 Months

"मला फेब्रुवारी, मे, जुलै आणि नोव्हेंबर महिन्यात हृदयविकाराचे झटके आले होते," असं या महिलेने सांगितलं. दरम्यान मध्यंतरी एकदा हृदयविकाराचा झटका आल्यासारखं वाटल्याने फार घाबरल्याने या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं.

9/10

5 Heart Attacks In 16 Months

या महिलेला मधुमेहाचा, हाय कोलेस्ट्रॉलचा आणि स्थूलपणाचा त्रास आहे. सप्टेंबर 2022 मध्ये या महिलेचं वजन 107 किलो होतं. तिचं वजन 30 किलोने कमी झालं आहे. तिला 'पीसीएसके 9 इंहेबिटर' इंजेक्शन दिली जात आहेत. कोलेस्ट्रॉल कमी असलेलं औषध तिला दिलं जात आहे. तिच्या शरीरातील साखरेचं प्रमाणही नियंत्रणात आहे. मात्र त्यानंतरही तिला हृदयविकाराचा त्रास होतोय.

10/10

5 Heart Attacks In 16 Months

दरवेळेस या महिलेच्या हृदयामध्ये वेगळ्या जागी ब्लॉक निर्माण होतो. "तिच्या पहिल्या अटॅकच्या वेळेस 90 टक्के ब्लॉक झाला होता," असं डॉक्टरांनी सांगितलं.