रविवारी मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; मुंबई लोकलवर होणार मोठा परिणाम

Feb 10, 2024, 17:14 PM IST
1/7

mumbai local

मध्य, पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

2/7

central railway

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

3/7

Local service

त्यामुळे या ब्लॉक दरम्यान, माटुंगा ते ठाण्यामध्ये अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे  नाहूर, कांजूरमार्ग, विद्याविहार या स्थानकांत लोकल सेवा उपलब्ध नसणार आहे.

4/7

Harbor line

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

5/7

CSMT to Panvel

त्यामुळे या कालावधीत सीएसएमटी ते पनवेल, पनवेल ते ठाणे लोकल सेवा बंद असणार आहे. तर, सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ठाणे ते वाशी/नेरूळ, बेलापूर/नेरूळ ते उरण दरम्यान लोकल सेवा सुरू असेल.

6/7

Western Railway

पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

7/7

Santa Cruz station

त्यामुळे सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. यावेळी काही लोकल रद्द करण्यात येतील.