मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात, डिव्हाइडर चा पत्रा कारच्या आरपार तरी... दैव बलवत्तर म्हणून वाचला तिघांचा जीव

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.  

Mar 18, 2023, 20:08 PM IST

Mumbai-Pune Expressway Accident : शनिवारी सकाळी सातच्या सुमारास सोमाटण्याजवळ झालेल्या या अपघातात डिव्हाडरचा पत्रा कारच्या आरपार झाला आहे.

1/5

Mumbai-Pune Expressway

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. 

2/5

mumbai pune somatane phata

मुंबईवरुन पुण्याकडे जाताना सोमाटने एक्झिट येथून देहूरोडच्या रस्त्यावरुन वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन् गाडीने थेट डिव्हाडरला धडक दिली. 

3/5

Mumbai-Pune Expressway Accident

चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या डिव्हायडरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की डिव्हाडरचा पत्रा कारच्या आरपार घुसला.

4/5

accident car passenger

या कारमध्ये चालक आणि दोन महिला प्रवासी असे एकूण तीन जण प्रवास करत होते. मात्र सुदैवाने या अपघातात कोणाचाही जीव गेलेला नाही.

5/5

urse village accident

दरम्यान, शुक्रवारीही झालेल्या एका भीषण अपघातात तिघांना जीव गमवावा लागला होता. भरधाव कारने ट्रकला धडक दिल्याने तिघांचा जीव गेला होता.