प्रगती एक्स्प्रेसचा मेकओव्हर

Nov 04, 2018, 07:54 AM IST
1/8

प्रगती एक्स्प्रेसचा मेकओव्हर

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसच्या सुविधांच्या दर्जात आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. 

2/8

प्रगती एक्स्प्रेसचा मेकओव्हर

ही एक्स्प्रेस रविवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. उत्कृष्ट रेक प्रकल्पांतर्गत हा बदल घडविण्यात आला आहे.

3/8

प्रगती एक्स्प्रेसचा मेकओव्हर

सध्या वापरात असलेल्या विविध रेल्वे गाड्यांच्या डब्यांची रचना बदलणे व त्यामध्ये अनेक नवीन सुविधा सुरू करण्यासाठी व अंतर्गत सजावट बदलण्यासाठी रेल्वे बोर्डाने परवानगी दिली आहे.

4/8

प्रगती एक्स्प्रेसचा मेकओव्हर

हवा खेळती राहावी यासाठी खास पद्धतीने खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी डब्यात भरपूर उजेड राहावा यासाठी एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत.

5/8

प्रगती एक्स्प्रेसचा मेकओव्हर

गाडीच्या डब्यांमध्ये हवेशीर वातावरण राहावे यासाठी नवीन पंखे बसविण्यात आले आहेत. एसी कोचमधील प्रवाशांना माहिती मिळण्यासाठी डिस्प्ले बसविण्यात आले आहेत. प्रत्येक डबा आकर्षक रंगसंगतीद्वारे सजविण्यात आला आहे.

6/8

प्रगती एक्स्प्रेसचा मेकओव्हर

मध्य रेल्वेतर्फे ५ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून त्यांचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. प्रत्येक रेकमध्ये नवीन सुविधा बसविण्यासाठी ६० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

7/8

प्रगती एक्स्प्रेसचा मेकओव्हर

प्रगती एक्स्प्रेसचा समावेश करून सुविधांचा दर्जा वाढविण्यात आला आहे. अधिक स्वच्छता राखता यावी यासाठी शौचालयामध्ये सिरामिक टाईल्स बसविण्यात आले आहेत.

8/8

प्रगती एक्स्प्रेसचा मेकओव्हर