Kurla च्या स्पेलिंगमध्येही 'C' नाही तरी लोकल इंडिकेटरवर 'C' का लिहलं जातं?

लोकल ही मुंबईकरांची लाइफ लाइन आहे. आज लोकलचा प्रवास हा सर्वात जलद मानला जातो. लोकल प्रशासन मुंबईकरांच्या प्रवासासाठी अनेक यंत्रणा राबवत असतात. त्यातील एक म्हणजे इंडिकेटर 

| Sep 05, 2024, 13:45 PM IST

Mumbai Local Train Update: लोकल ही मुंबईकरांची लाइफ लाइन आहे. आज लोकलचा प्रवास हा सर्वात जलद मानला जातो. लोकल प्रशासन मुंबईकरांच्या प्रवासासाठी अनेक यंत्रणा राबवत असतात. त्यातील एक म्हणजे इंडिकेटर 

1/7

Kurla च्या स्पेलिंगमध्येही 'C' नाही तरी लोकल इंडिकेटरवर 'C' का लिहलं जातं?

Mumbai railway station codes why c use for kurla station

 रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात असे इंडिकेटर लावण्यात येतात. या इंडिकेटरवर कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोणती ट्रेन येणार व किती वेळात येईल याची थोडक्यात माहिती दिली असते.  

2/7

Mumbai railway station codes why c use for kurla station

ट्रेनच्या माहितीसाठी विविध स्थानकाच्या माहितीसाठी ट्रेनला काही कोड दिले जातात. हे कोड इंडिकेटरवर दाखवले जातात. 

3/7

Mumbai railway station codes why c use for kurla station

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकासाठी C, अंधेरीसाठी A, दादरसाठी D असे कोड देण्यात आले आहेत. ट्रेन येण्यासाठी हे कोड इंडिकेटवर दर्शवले जातात. 

4/7

Mumbai railway station codes why c use for kurla station

तसंच, मध्य रेल्वेवरदेखील ठाणे स्थानकासाठी T, डोंबिवली स्थानकासाठी D आणि टिटवाळा स्थानकासाठी TL असे देण्यात आले आहेत.

5/7

Mumbai railway station codes why c use for kurla station

पण कुर्ला स्थानकाला C असा कोड देण्यात आला आहे. आता कुर्ला नावाच्या स्पेलिंगमध्येही C नाही तरी हा कोड का देण्यात आला, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

6/7

Mumbai railway station codes why c use for kurla station

कुर्ला रेल्वे स्थानकाची स्थापना 1865 साली करण्यात आली. पहिले कुर्ला परिसराच्या आजूबाजूला खाडी होत्या. त्याच खाडीत मोठ्या प्रमाणात कुर्ल्या म्हणजेच खेकडे मिळायचे. त्यावरुनच या गावाला कुर्ला असं नाव पडलं. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी गावाच्या नावावरुनच कुर्ला असं स्थानकाला नाव दिलं.

7/7

Mumbai railway station codes why c use for kurla station

कुर्ला स्थानक हे ब्रिटिश काळातील आहे. तत्कालीन ब्रिटीश अधिकारी कुर्ला स्थानकाचं स्पेलिंग Coorla असं लिहित होते. नंतर या स्थानकाच्या नावात बदल केला गेला. मात्र, लोकल इंडिकेटरवर कुर्लाचा कोड C असाच ठेवण्यात आला.