मुंबईला मिळणार आणखी एक रेल्वे टर्मिनस, CSMT ची गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय

रेल्वे प्रशासन परळ टर्मिनसचे काम वर्षभरात पूर्ण करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील या नवीन रेल्वे टर्मिनससाठी परळ रेल्वे वर्कशॉपची 19 एकर जागा निवडण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी परळ टर्मिनसवर पाच प्लॅटफॉर्म ठेवण्याची योजना आहे.

| Jul 25, 2023, 09:28 AM IST

New Railway Terminus in Mumbai:रेल्वे प्रशासन परळ टर्मिनसचे काम वर्षभरात पूर्ण करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील या नवीन रेल्वे टर्मिनससाठी परळ रेल्वे वर्कशॉपची 19 एकर जागा निवडण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी परळ टर्मिनसवर पाच प्लॅटफॉर्म ठेवण्याची योजना आहे.

1/7

मुंबईत आणखी एक रेल्वे टर्मिनस, CSMT ची गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय

Mumbai to get another railway terminus plans to build 5 platforms instead of Paral workshop

Parel Terminus: मुंबईकर आणि लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईबाहेर रेल्वने जाण्यासाठी प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे (CSMT) स्थानकाला पसंती देतात. त्यामुळे येथे रोज खूप गर्दी पाहायला मिळते. पण आता हा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, परळ येथे मध्य रेल्वेचे नवीन टर्मिनस बांधण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. म्हणजेच मध्य रेल्वेचे चौथे टर्मिनस मुंबईला मिळणार आहे.

2/7

युनिट्स माटुंगा कारशेडमध्ये

Mumbai to get another railway terminus plans to build 5 platforms instead of Paral workshop

सध्या परळच्या या ठिकाणी रेल्वेची मोठी वर्कशॉप आहे. आता येथील काही युनिट्स माटुंगा कारशेडमध्ये हलवण्यात येणार आहेत. येथून 88 लांब पल्ल्याच्या गाड्या दररोज सुटतात आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येतात. त्यामुळे दिवसभर लोड असते.

3/7

गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

Mumbai to get another railway terminus plans to build 5 platforms instead of Paral workshop

तसेच दादर ते सीएसएमटी स्थानकादरम्यान काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास सर्व गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या पॅसेंजर गाड्या आणि मुंबई लोकल गाड्या रद्द कराव्या लागतात. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने परळ येथे नवीन टर्मिनस बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

4/7

लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रचंड गर्दी

Mumbai to get another railway terminus plans to build 5 platforms instead of Paral workshop

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रचंड गर्दी असते. हे कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने परळ वर्कशॉपच्या जागेवर परळ टर्मिनस बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या टर्मिनसचे बांधकाम या वर्षअखेरीस सुरू होणे अपेक्षित आहे. सध्या मुंबईत मध्य रेल्वेचे केवळ तीन टर्मिनस आहेत.

5/7

या स्थानकांवर प्रचंड ताण

Mumbai to get another railway terminus plans to build 5 platforms instead of Paral workshop

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) यांचा समावेश आहे. त्यामुळे या स्थानकांवर प्रचंड ताण आहे. यापैकी 88 लांब पल्ल्याच्या गाड्या सीएसएमटी स्थानकावरून दररोज येतात आणि जातात. तर 1200 हून अधिक उपनगरीय गाड्या म्हणजेच मुंबई लोकल ट्रेन येथून धावतात.

6/7

वर्कशॉपची 19 एकर जागा

Mumbai to get another railway terminus plans to build 5 platforms instead of Paral workshop

रेल्वे प्रशासन परळ टर्मिनसचे काम वर्षभरात पूर्ण करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील या नवीन रेल्वे टर्मिनससाठी परळ रेल्वे वर्कशॉपची 19 एकर जागा निवडण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी परळ टर्मिनसवर पाच प्लॅटफॉर्म ठेवण्याची योजना आहे.

7/7

200 कोटी रुपयांची तरतूद

Mumbai to get another railway terminus plans to build 5 platforms instead of Paral workshop

यामध्ये डबे उभारण्यासाठी पाच स्टेबल लाइन करण्यात येणार असून गाड्यांची देखभाल आणि तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी पाच पिट लाईनही करण्यात येणार आहेत. यासाठी रेल्वेने 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.