मुंबईत पाणी कपात! 'या' भागांमध्ये 24 ऑगस्टला पाणीपुरवठा बंद

| Aug 22, 2023, 17:28 PM IST
1/7

मुंबईतील 'या' विभागांमध्ये 24 ऑगस्टला पाणीपुरवठा बंद

Mumbai Water supply cut off on August 24 in these area know here

मुंबई पालिकेच्या ट्रॉम्बे उच्च स्तरीय जलाशयातील कप्पा क्रमांक 1 व 2 ची दुरुस्ती कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे झाल्यानंतर ‘कप्पा क्रमांक 1’ मध्ये इनलेटद्वारे (1800 मीमी) पाणी भरणा करण्याचे काम गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट  ते शुक्रवार 25 ऑगस्ट 2023 रोजी हाती घेण्यात येणार आहे. 

2/7

25 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपर्यंत

Mumbai Water supply cut off on August 24 in these area know here

या अनुषंगाने संबंधित तांत्रिक बाबींच्या गरजेनुसार ‘एम पूर्व’ व ‘एम पश्चिम’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

3/7

‘एम पूर्व’ विभाग

Mumbai Water supply cut off on August 24 in these area know here

 रफिक नगर, बाबा नगर, आदर्श नगर, संजय नगर, निरंकार नगर, मंडाळा, २० फिट व ३० फिट रोड, एकता नगर, म्हाडा इमारती, शिवाजी नगर रोड क्रमांक ०१ ते ०६, बैंगणवाडी रोड क्रमांक ०७ ते १५, कमला रमण, रमण मामा नगर, अहिल्यादेवी होळकर मार्ग, गौतम नगर, लोटस वसाहत, नटवर पारेख कंपाऊंड, शंकरा वसाहत, इंडियन ऑइल नगर विभाग, टाटानगर, गोवंडी स्टेशन रोड, देवनार मनपा कॉलनी, गोवंडी, लल्लूभाई इमारती, जे. जे. रोड (ए, बी, आय, एफ सेक्टर), सी, डी, ई, जी, एच, जे, के सेक्टरमध्ये पाणी पुरवठा बंद राहील. 

4/7

पाणी भरुन ठेवा

Mumbai Water supply cut off on August 24 in these area know here

यासोबतच चिता कॅम्प, कोळीवाडा, पायलीपाडा, ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्ता नगर, बालाजी मंदिर रोड, एस. पी. पी. एल. इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर, देवनार फार्म रोड, देवनार व्हिलेज रोड, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बी. के. एस .डी. मार्ग जवळील भाग, टेलिकॉम फॅक्टरी, बी. ए. आर. सी. नेव्हल डॉकयार्ड, मानखुर्द, मंडाळा गाव, डिफेन्स एरिया, मानखुर्द व्हिलेज, बोरबादेवी, घाटला, बी. ए. आर. सी. फॅक्टरी, बी. ए. आर. सी. वसाहत, गौतम नगर, पांजरपोळ या परिसरांमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल. 

5/7

‘एम पश्चिम’ विभाग

Mumbai Water supply cut off on August 24 in these area know here

‘एम पश्चिम’ विभाग - पी. एल. लोखंडे मार्ग, शांता जोग मार्ग, पी. वाय. थोरात मार्ग, छेडानगर, श्रीनगर सोसायटी, मुकुंदनगर, एस. टी. रोड, हेमू कलाणी मार्ग, सी. जी. गिडवाणी मार्ग, चेंबूर, इंदिरा नगर, चेंबूर मार्केट, चेंबूर नाका, शेल कॉलनी रोड, एन. जी. आचार्य मार्ग, उमर्शी बाप्पा चौकात पाणी येणार नाही.

6/7

पूर्ण दिवस पाणी नाही

Mumbai Water supply cut off on August 24 in these area know here

घाटला, अमर नगर, मोतीबाग, खारदेव नगर, वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ वसाहत, लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, आतुर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर, श्यामजीवी नगर या परिसरांमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

7/7

पाणी जपून वापरा

Mumbai Water supply cut off on August 24 in these area know here

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद असण्याचा अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असण्याच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.