मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री 'केईएम'ला भेट, वॉर्डच्या कामांना 12 तासांत युद्धपातळीवर सुरूवात

KEM Hospital: मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांमधील विविध व्यवस्थांची तसेच विभागांची काल पाहणी करुन समाधान व्यक्त केले होते. तसेच सहा वॉर्डांचे नूतनीकरण तातडीने सुरु करुन ही कामे पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही भेटीदरम्यान केल्या होत्या. 

| Aug 22, 2023, 16:20 PM IST

KEM Hospital: नूतनीकरणानंतर या सहा वॉर्डच्या उपलब्धततेमुळे सुमारे 420 रूग्णांना उपचार देण्याची वाढीव क्षमता निर्माण होणे शक्य होईल. परिणामी रूग्णालयाच्या सुविधांमध्ये भर पडतानाच अधिक गुणवत्तापूर्ण सुविधा रूग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. 

1/7

नूतनीकरणाचे काम

मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री 'केईएम'ला भेट, वॉर्डच्या कामांना 12 तासांत युद्धपातळीवर सुरूवात

मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या सहा वॉर्डच्या संपूर्ण नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे.

2/7

कामांना सुरूवात

CM Eknath Shinde visit to KEM Hospital ward works started within 12 hours

केईएममधील सहा वॉर्डच्या कामांमध्ये स्थापत्य, विद्युत, नवीन फर्निचर आणि वैद्यकीय प्राणवायू वाहिनी (मेडिकल ऑक्सिजन पाईपलाईन) यासारखी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी बांधकामाच्या किरकोळ कामांना सुरूवात झाली.

3/7

सहा वॉर्डचा समावेश

CM Eknath Shinde visit to KEM Hospital ward works started within 12 hours

यामध्ये वॉर्ड क्रमांक 4, 4ए, 6, 7, 11 आणि 12 या सहा वॉर्डचा समावेश आहे. याआधी या प्रत्येक वॉर्डचे काम स्वतंत्रपणे करण्याचे नियोजित होते. या प्रत्येक वॉर्डमध्ये 60 ते 70 इतकी रूग्णसेवा देण्याची क्षमता आहे. 

4/7

420 रूग्णांना उपचार

CM Eknath Shinde visit to KEM Hospital ward works started within 12 hours

नूतनीकरणानंतर या सहा वॉर्डच्या उपलब्धततेमुळे सुमारे 420 रूग्णांना उपचार देण्याची वाढीव क्षमता निर्माण होणे शक्य होईल. 

5/7

अधिक गुणवत्तापूर्ण सुविधा

CM Eknath Shinde visit to KEM Hospital ward works started within 12 hours

परिणामी रूग्णालयाच्या सुविधांमध्ये भर पडतानाच अधिक गुणवत्तापूर्ण सुविधा रूग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. 

6/7

मध्यरात्री भेट

CM Eknath Shinde visit to KEM Hospital ward works started within 12 hours

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयातील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी मध्यरात्री भेट दिली होती. यानंतर 12 तासांच्या आत या कामांना सुरूवात झाली आहे. 

7/7

भेटीदरम्यान सूचना

CM Eknath Shinde visit to KEM Hospital ward works started within 12 hours

मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांमधील विविध व्यवस्थांची तसेच विभागांची काल पाहणी करुन समाधान व्यक्त केले होते. तसेच सहा वॉर्डांचे नूतनीकरण तातडीने सुरु करुन ही कामे पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही भेटीदरम्यान केल्या होत्या.